Stock Market Updates | सेन्सेक्स, निफ्टीत चढ-उतार, हे शेअर्स ॲक्शनमध्ये?

Stock Market Updates | सेन्सेक्स, निफ्टीत चढ-उतार, हे शेअर्स ॲक्शनमध्ये?

पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातील तेजीचा मागोवा घेत भारतीय शेअर बाजाराने आज मंगळवारी किरकोळ वाढीसह सुरुवात केली होती. पण काही वेळातच सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट झाले. बाजारातील सुरुवातीच्या तेजीत बँकिंग, फायनान्सियल, ऑटो स्टॉक्स आघाडीवर होते. सकाळी १०.२० वाजता सेन्सेक्स १०० अंकांच्या वाढीसह ६६,६२९ वर व्यवहार करत होता. तर निफ्टी १९,७७८ वर होता. त्यानंतर दोन्ही निर्देशांक घसरले. (Stock Market Updates)

सेन्सेक्सवर एनटीपीसी, टेक महिंद्रा, एम अँड एम, एचसीएल टेक, सन फार्मा, टाटा मोटर्स, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, टीसीएस हे शेअर्स वधारले आहेत. तर पॉवर ग्रिड, बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंट्स, एलटी, रिलायन्स, इंडसइंड बँक हे शेअर्स घसरले आहे.

या आर्थिक वर्षाच्या (FY24) पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा ५१ टक्के वाढून ३२३ कोटींवर गेल्यानंतर अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स सुमारे ४ टक्क्यांनी वाढले. दरम्यान, आशियाई बाजारात तेजीचे वातावरण आहे. हाँगकाँगचा हँगसेंग, जपानचा निक्केई निर्देशांक वाढून व्यवहार करत आहेत. (Stock Market Updates)

 हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news