Stock Market Updates | सेन्सेक्सची उसळी! गुंतवणूकदार ५.५ लाख कोटींनी मालामाल

Stock Market Updates | सेन्सेक्सची उसळी! गुंतवणूकदार ५.५ लाख कोटींनी मालामाल
Published on
Updated on

Stock Market Updates : आशियाई बाजारांचा मागोवा घेत भारतीय शेअर बाजाराने आज सोमवारी (दि.२६) स्थिर सुरुवात केली होती. त्यानंतर बाजाराने बँकिंग, वित्तीय स्टॉक्समधील वाढीच्या जोरावर उसळी घेतली. बीएसई सेन्सेक्सने ६० हजार अंकांवर पुन्हा चाल केली. सेन्सेक्सने आज ८०० अंकांनी वाढून व्यवहार केला. तर निफ्टीने १८ हजारांवर झेप घेतली. त्यानंतर सेन्सेक्स ७२१ अंकांच्या वाढीसह ६०,५६६ वर बंद झाला. तर निफ्टी १८ हजारांजवळ जाऊन बंद झाला. दरम्यान, बीएसईवरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल (market capitalisation) २७७.६ लाख कोटींवर गेल्याने गुंतवणूकदारांना ५.५ लाख कोटींचा फायदा झाला.

जागतिक बाजारातील संकेत संमिश्र आहेत. चीनमधील वाढत्या कोरोनामुळे जगभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यात जगावर संभाव्य मंदीचे संकट घोंघावत आहे. अशा परिस्थितीतही भारतीय शेअर बाजार यातून सावरला. फार्मा वगळता, सर्व प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांनी आज आघाडी घेतली. मेटल स्टॉक्स १ टक्क्यांपेक्षा जास्त वाढला. मागील सत्रात या स्टॉक्समध्ये ४ टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली होती.

टाटा मोटर्सचे शेअर्स वधारले

निफ्टीवर इंडसइंड बँक, एसबीआय, टाटा स्टील आणि टाटा मोटर्स हे टॉप गेनर्स होते. तर डॉ. रेड्डी, डिव्हिस लॅब आणि सिप्ला यांचे शेअर्स मागे पडले होते. टाटाच्या मालकीची उपकंपनी TML CV मोबिलिटी सोल्युशन्सने दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (DTC) सोबत नवी दिल्लीत १,५०० इलेक्ट्रिक बस चालवण्याचा करार केल्यानंतर टाटा मोटर्सचे शेअर्स २.६८ टक्क्यांनी वाढून ३८८.४५ रुपयांवर पोहोचले. लार्सन अँड टुब्रोचे शेअर्स २ टक्क्यांपेक्षा जास्त वाढून २१०६ रुपयांवर गेले. एनडीटीव्हीचा शेअर आज ५ टक्क्यांनी वाढून ३५७ रुपयांवर पोहोचला.

जागतिक बाजारातून संकेत संमिश्र

जागतिक बाजारातील संकेत संमिश्र आहेत. अमेरिकेतील डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज निर्देशांक ०.५३ टक्क्यांनी वाढला आहे. तर S&P ५०० यात देखील किरकोळ वाढ दिसून आली. नॅस्डॅक नॅस्डॅक कंपोझिट ०.२१ टक्क्यांनी वर गेला होता. आशियाई बाजारावर नजर टाकली तर जपानचा निक्केई निर्देशांक ०.४ टक्क्यांनी वधारला. दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि चीनचा शांघाय कंपोझिट निर्देशांक स्थिर पातळीवर राहिले. हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक ०.४४ टक्क्यांनी खाली आला. सिंगापूर एक्स्चेंजवरील निफ्टी फ्यूचर्सने ०.१२ टक्क्यांनी वाढून १७,८८६ वर व्यवहार केला. (Stock Market Updates)

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news