Stock Market Updates | सेन्सेक्सने ‘मुहूर्त ट्रेडिंग’मधील तेजी गमावली, कशामुळे बिघडली बाजाराची चाल?

Stock Market Updates | सेन्सेक्सने ‘मुहूर्त ट्रेडिंग’मधील तेजी गमावली, कशामुळे बिघडली बाजाराची चाल?

पुढारी ऑनलाईन : दिवाळीतील मुहूर्त ट्रेडिंगच्या विशेष सत्रात शेअर बाजाराने वाढ नोंदवली होती. पण सोमवारच्या व्यवहारात घसरण दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे २७५ हून अधिक अंकांनी घसरून ६५ हजारांच्या खाली आला. तर निफ्टी ७५ अंकांच्या घसरणीसह १९,४५० वर होता. इन्फोसिस, एचडीएफसी बॅंक, रिलायन्स आदी हेवीवेट शेअर्समध्ये विशेषतः घसरण झाली आहे. (Stock Market Updates)

सेन्सेक्सवर बजाज फायनान्स, इन्फोसिस, नेस्ले इंडिया, एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा, कोटक बँक हे शेअर्स घसरले आहेत. तर एनटीपीसी, इंडसइंड बँक हे शेअर्स वाढले आहेत.

सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल चिन्हात गेले आहेत. निफ्टी आयटी ०.६ टक्क्यांनी, निफ्टी फायनान्सियल ०.५७ टक्क्यांनी खाली आला आहे. निफ्टी बॅंक, ऑटो, एफएमसीजी, मीडिया, मेटल, फार्मा आणि रियल्टी देखील घसरले आहेत. (Stock Market Updates)

रविवारी संध्याकाळी झालेल्या विशेष ६० मिनिटांच्या मुहूर्त ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी सुमारे अर्ध्या टक्क्यांनी वाढल्याने संवत २०८० ची सुरुवात गुंतवणूकदारांसाठी स्थिरतेने झाली. या सत्रात सेन्सेक्स ३५५ अंकांनी म्हणजेच ०.५५ टक्क्यांनी वाढून ६५,२५९ वर बंद झाला होता. तर निफ्टी १०० अंकांनी म्हणजेच ०.५२ टक्क्यांनी वाढून १९,५२६ वर बंद झाला. दोन्ही निर्देशांकांनी मुहूर्त ट्रेडिंगमध्ये पाच वर्षांतील सर्वोत्तम नफा नोंदवला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news