Stock Market Opening Bell | सेन्सेक्स, निफ्टीची सावध सुरुवात, ‘हे’ शेअर्स ॲक्शनमध्ये?

Stock Market Opening Bell | सेन्सेक्स, निफ्टीची सावध सुरुवात, ‘हे’ शेअर्स ॲक्शनमध्ये?

पुढारी ऑनलाईन : गेल्या पाच दिवसांत विक्रमी उच्चांकावर व्यवहार करणाऱ्या सेन्सेक्स आणि निफ्टीने आज बुधवारी (दि.५) सावध सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स १०० अंकांनी खाली आला होता. तर निफ्टी १९,३५० वर होता. त्यानंतर काही वेळातच दोन्ही निर्देशांक सपाट झाले. सकाळी ९.३० वाजता सेन्सेक्स ९६ अंकांच्या वाढीसह ६५,५७५ वर तर निफ्टी २५ अंकांनी वाढून १९,४१४ वर व्यवहार करत होता. सुरुवातीच्या व्यवहारात बँकिंग आणि फायनान्सियल स्टॉक तेजीत होते. (Stock Market Opening Bell)

सेन्सेक्सवर इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, मारुती, हिंदुस्तान युनिलिव्हर. पॉवर ग्रिड, एचसीएल टेक, एलटी, टाटा स्टील, नेस्ले टेक हे शेअर्स वाढले. तर एचडीएफसी बँक, एचडीएफसी, विप्रो, एनटीपीसी, भारती एअरटेल हे शेअर्स घसरले. दरम्यान, Paytm चा शेअर २ टक्क्यांनी वधारला आहे. (Stock Market Opening Bell)

आशियाई बाजारात घसरण

चीनमधील आर्थिक गती मंदावल्याने बुधवारी आशियाई शेअर बाजारांत घसरण झाली. गुंतवणूकदारांचे लक्ष आता फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीच्या निर्णयाकडे लागले आहे. MSCI चा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा व्यापक निर्देशांक ०.७ टक्के घसरला. जपानचा निक्केई निर्देशांकदेखील ०.४ टक्के घसरला. चीनमधील एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की सेवा क्षेत्राचा विकास जूनमध्ये मंदावला आहे. या पार्श्वभूमीवर आशियाई बाजारात घसरण झाली आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news