Stock Market Closing | सेन्सेक्सची उच्चांकी झेप, बाजार भांडवल २९४ लाख कोटींवर, जाणून घ्या मार्केटमधील घडामोडी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातून कमकुवत संकेत असतानाही आज बुधवारी भारतीय शेअर बाजारात जोरदार खरेदी झाली. सेन्सेक्सने आज नवा उच्चांक गाठत ६३,५८८ वर व्यवहार केला. तर निफ्टीही उच्चांकाजवळ १८,८५० वर राहिला. रिलायन्स, एचडीएफसी शेअर्समधील खरेदीने सेन्सेक्सला मोठी उभारी मिळाली. (Sensex hits record high) सेन्सेक्स आज १९५ अंकांनी वाढून ६३,५२३ वर बंद झाला. तर निफ्टी ४० अंकांच्या वाढीसह १८,८५६ वर स्थिरावला. (Stock Market Closing)

दरम्यान, सेन्सेक्सच्या आजच्या विक्रमी उच्चांकामुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २९४.४९ लाख कोटींवर पोहोचले. बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवलाचा हा उच्चांक आहे. इक्विटीमधील आशावादामुळे बाजार भांडवल (mcap) सकाळच्या व्यवहारात २,९४,४९,०६९.६३ कोटींच्या सार्वकालीन उच्चांकावर पोहोचण्यास मदत झाली. तसेच बँक आणि फायनान्सियल सेक्टरमुळे बाजाराला सपोर्ट मिळाला. विशेषतः एचडीएफसीच्या दोन्ही शेअर्समध्ये अधिक तेजी राहिली. तर मेटल स्टॉक्सची खराब कामगिरी राहिली.

निफ्टीचीही झेप

आजच्या ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स २६० अंकांनी वाढून ६३,५८८ वर पोहोचला. हा सार्वकालीन उच्चांक आहे. याआधी १ डिसेंबर २०२२ रोजी सेन्सेक्सने ६३,५८३ अंकावर व्यवहार केला होता. दरम्यान, निफ्टी ५० ने आज १८,८७० वर झेप घेतली. याआधीचा निफ्टीचा सार्वकालीन उच्चांक १८,८८७ चा आहे. निफ्टी या सार्वकालीन उच्चांकापासून अगदी जवळ आहे.

हे शेअर्स तेजीत

शेअर बाजारातील सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीने (Nifty) बुधवारी (दि. २१) तेजीत सुरुवात केली होती. सेन्सेक्सवर पॉवर ग्रिड, विप्रो, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, एलटी, रिलायन्स, टेक महिंद्रा, एचसीएल टेक हे शेअर्स वाढले. तर एम अँड एम, आयटीसी, टाटा स्टील (Tata Steel), टाटा मोटर्स, ॲक्सिस बँक, मारुती, इंडसइंड बँक, एशियन पेंट्स हे शेअर्स घसरले. (Stock Market Opening)

मिडकॅप, स्मॉलकॅप निर्देशांक वाढले

क्षेत्रीय निर्देशांकांत मेटल सुमारे १ टक्क्याने घसरला. एफएमसीजी निर्देशांक ०.४ टक्क्याने आणि रियल्टी निर्देशांक ०.३ टक्क्यानी खाली आला, तर पॉवर निर्देशांक १ टक्क्याने आणि तेल आणि वायू निर्देशांक ०.५ टक्क्यांनी वधारला. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.७ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.२ टक्क्यांनी वधारला.

श्री सिमेंटला फटका

मीडिया रिपोर्टनुसार, आयकर विभागाने राजस्थानमधील श्री सिमेंट लिमिटेडच्या पाच ठिकाणी सर्वेक्षणाची कारवाई केली होती. या पार्श्वभूमीवर श्री सिमेंटचा (Shree Cements) शेअर २ टक्के घसरून २५,४१३ रुपयांवर आला.

श्रीराम फायनान्स आणि पिरामल एंटरप्रायझेसचे शेअर्स १० टक्के अप्पर सर्किट्सवर खुले झाले. कारण पिरामल एंटरप्रायझेसकडून कंपनीतील संपूर्ण ८.३४ टक्के भागभांडवल ब्लॉक डीलद्वारे विकण्याची शक्यता आहे. (Stock Market Closing)

एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) मंगळवारी १,९४२.६२ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.

आशियाई बाजारात संमिश्र परिस्थिती

आशियाई बाजारातील टोकियोतील शेअर बाजारात तेजी होती. पण सेऊल, शांघाय आणि हाँगकाँगमधील बाजारात कमजोर स्थिती दिसून आली. दरम्यान, अमेरिकेतील शेअर बाजारातील निर्देशांक मंगळवारी घसरुन बंद झाले होते. जागतिक ऑईल बेंचमार्क ब्रेंट क्रूड ०.४६ टक्क्यांनी वाढून ७६.२४ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news