Stock Market Closing bell | शेअर बाजारात तेजीला ब्रेक, सेन्सेक्स ६७,६०० च्या खाली बंद

Stock Market Closing bell | शेअर बाजारात तेजीला ब्रेक, सेन्सेक्स ६७,६०० च्या खाली बंद

पुढारी ऑनलाईन : जागतिक संमिश्र संकेतांदरम्यान आज सोमवारी शेअर बाजारात घसरण झाली. आजच्या अस्थिर सत्रात सेन्सेक्स २४१ अंकांनी घसरून ६७,५९६ वर बंद झाला. तर निफ्टी ५९ अंकांच्या घसरणीसह २०,१३३ वर स्थिरावला. क्षेत्रीय पातळीवर PSU बँक निर्देशांक ३.४ टक्क्यांनी वाढला. पॉवर, ऑटो आणि एफएमसीजी निर्देशांकही वधारले, तर रियल्टी आणि मेटल निर्देशांक प्रत्येकी १ टक्क्यांनी घसरले. बँक, आयटी, फार्मा निर्देशांक प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप ०.२७ टक्क्यांनी आणि स्मॉल कॅप ०.६० टक्क्यांनी घसरला. (Stock Market Closing bell)

संबंधित बातम्या 

सेन्सेक्स आज ६७,६६५ वर खुला झाला होता. सेन्सेक्सवर एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, इन्फोसिस, टाटा स्टील, विप्रो, अल्ट्राटेक सिमेंट, कोटक बँक, रिलायन्स, टेक महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील हे शेअर्स घसरले. तर पॉवर ग्रिड, टायटन, एम अँड एम, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स, एसबीआय, नेस्ले इंडिया, आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स वाढले.

निफ्टी ५० वर पॉवर ग्रिड, टायटन, एम अँड एम, एनटीपीसी, बीपीसीएल हे टॉप गेनर्स राहिले. तर हिंदाल्को, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, डॉ. रेड्डीज, अदानी पोर्ट्स हे टॉप लूजर्स ठरले. (Stock Market Closing bell)

हिंदुस्तान एरोनॉटिक्स शेअर्स वधारले

सरकारी एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स (HAL) चे शेअर्स आज बीएसईवर ४ टक्क्यांनी वाढून ४,१०८ रुपयांवर पोहोचले. त्यानंतर हे शेअर्स ३,९६७ रुपयांवर स्थिरावले. संरक्षण अधिग्रहण परिषदेने (DAC) १२ Su-30MKI विमानांच्या खरेदीला आणि डॉर्नियर विमानांच्या एव्हिओनिक्स अपग्रेडेशनला मंजुरी दिल्यानंतर HAL चे शेअर्स वधारल्याचे दिसून आले. संरक्षण अधिग्रहण परिषदेने ४५ हजार कोटी रुपयांच्या नऊ भांडवली संपादन योजनांसाठी अ‍ॅक्सेप्टन्स ऑफ नेसेसिटी (AoN) ला मंजुरी दिली आहे. (Hindustan Aeronautics Share Price)

व्होडाफोन आयडियाला फटका

आज व्होडाफोन आयडियाचे शेअर्स (Vodafone Idea shares) सुमारे ५ टक्क्यांनी घसरून एनएसई (NSE) वर ११ रुपयांच्या निचांकी पातळीवर आले. व्होडाफोन आयडियाने एक्स्चेंजला दिलेल्या फाईलमध्ये म्हटले आहे की, "व्होडाफोन आयडिया लवकरच अमेरिकेची टेलिकॉम कंपनी विकत घेणार?. या शर्यतीत व्हेरिझॉन, अॅमेझॉन किंवा स्टारलिंक असल्याचे वृत्त सोशल मीडियावर फिरत आहे. पण या वृत्ताचे खंडन केले आहे. कंपनीने याबाबत कोणाशीही चर्चा केली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

आशियाई बाजारातही आज घसरण राहिली. हाँगकाँगच्या बाजारात कमकुवत स्थिती दिसून आली. टोकियोतील शेअर बाजार आज सुट्टीमुळे बंद होता.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news