Stock Market Closing Bell | सेन्सेक्स ३०० अंकांनी घसरला, निफ्टी १९,७०० च्या खाली, बाजाराचा मूड का बिघडला?

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स ३०० अंकांनी घसरला, निफ्टी १९,७०० च्या खाली, बाजाराचा मूड का बिघडला?

Published on

पुढारी ऑनलाईन : हेवीवेट आणि बँकिंग स्टॉक्समधील नुकसानीमुळे तसेच जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे शेअर बाजाराचा मूड सलग दुसऱ्या दिवशी बिघडला. सेन्सेक्स आज सोमवारी २९९ अंकांनी घसरून ६६,३८४ वर बंद झाला. तर निफ्टी ७२ अंकांनी घसरून १९,६७२ पर्यंत खाली आला. मेटल, एफएमसीजी आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी झाल्याने बाजारावर दबाव राहिला. तर ऑटो, PSU बँकिंग आणि आयटी स्टॉक्समधील खरेदीमुळे सपोर्ट मिळाला.

क्षेत्रीय पातळीवर एफएमसीजी निर्देशांक जवळपास २ टक्के आणि ऑईल आणि गॅस, बँक आणि मेटल प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी घसरले. तर पॉवर आणि कॅपिटल गुड्स निर्देशांक प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.२ टक्क्यांनी वाढला, तर स्मॉलकॅप निर्देशांक सपाट बंद झाला. (Stock Market Closing Bell)

हेवीवेट स्टॉक्समध्ये घसरण

सेन्सेक्स आज ६६,६२९ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६६,८०६ पर्यंत वाढला. त्यानंतर तो ६६,४०० च्या खाली आला. सेन्सेक्सवर इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, एम अँड एम, पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट, एलटी, टीसीएस, एशियन पेंट्स, टाटा मोटर्स, इन्फोसिस, एनटीपीसी हे शेअर्स वाढले. तर कोटक बँक, आयटीसी हे सेन्सेकवरील टॉप लूजर्स ठरले. कोटक बँकेचा शेअर सुमारे ४ टक्क्यांनी घसरून १,८९३ रुपयांवर आला. तर आयटीसी शेअर ३ टक्क्यांनी घसरून ४७३ रुपयांपर्यंत खाली आला. टेक महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील हे शेअर्सही घसरले. (Stock Market Closing Bell)

परदेशी गुंतवणूकदारांचा खरेदीला ब्रेक

तात्पुरत्या NSE डेटानुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी सहा दिवसांच्या खरेदीचा सिलसिला थांबवला. त्यांनी निव्वळ आधारावर १,९९९ कोटी रुपये भारतीय शेअर्स ऑफलोड केले, तर स्थानिक गुंतवणूकदारांनी १,२९१ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news