निफ्टीची वाटचाल वीस हजारांच्या दिशेने | पुढारी

निफ्टीची वाटचाल वीस हजारांच्या दिशेने

भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा.लि.

सलग चौथ्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात निर्देशांकांनी वाढ नोंदवून सार्वकालीन उंचीवर आपले मार्गक्रमण सुरू ठेवले. निफ्टी आणि सेन्सेक्स हे प्रमुख निर्देशांक जवळपास एक टक्क्यांनी वाढून अनुक्रमे 19745 आणि 66684.26 वर बंद झाले. बीएसई, मिडकॅप इंडेक्स अर्धा टक्क्यांनी वाढला, तर बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स सव्वा टक्क्यांहून अधिक वाढला. अमेरिकेची दिवसेंदिवस सशस्त्र होणारी अर्थव्यवस्था, जागतिक बाजारातील समाधानकारक वातावरण आणि परदेशी वित्त संस्थांची भारतीय बाजारातील अविरत खरेदी यामुळे तेजीची ही घोडदौड सुरू आहे. या आठवड्यात परदेशी वित्तसंस्थांशी 4726 कोटी रुपयांची खरेदी केली.

भारतीय शेअर बाजारातील दिग्गज एचडीएफसी बँकेने आपल्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. निव्वळ नफ्यात तीस टक्के वाढ, निव्वळ व्याजापासून मिळणार्‍या उत्पन्नात एकवीस टक्के वाढ, ठेवींमध्ये एकोणीस टक्के वाढ अशी सर्वांगीण सशक्त वाढ या बँकेने दर्शवली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ASA डिपॉझिट्समध्ये (सेव्हिंग्ज आणि करंट अकाऊंट्स) अकरा टक्के वाढ झाली आहे. बँकेच्या एकूण ठेवींपैकी साडे बेचाळीस टक्के वाटा हा कास डिपॉझिट्सचा आहे. यावरून या बँकेची गुणात्मक वाढ कशी होत आहे ते दिसून येईल. बँकेचा शेअर सप्ताहात 2.57 टक्क्यांनी वाढून शुक्रवारी 1677.75 वर बंद झाला.

Route Mobile चा शेअर आठवड्यात सुमारे 15 टक्के आपटून 1490.40 वर बंद झाला. बेल्जियमच्या Rproximus Group ने या कंपनीमधील प्रवर्तकांचा 58 टक्के हिस्सा खरेदी केला. टेलिकॉम कंपन्यांना सेवा पुरवणारी ही Cloud based कंपनी आहे.

वायर्स आणि केबल्स उत्पादक कंपनी Poly cab ने निव्वळ नफ्यात तब्बल 81 टक्के वाढ असे सशक्त निकाल जाहीर केले आणि आठवड्यात या शेअरने 16 टक्क्यांची उसळी घेऊन शुक्रवारी तो 4581 वर बंद झाला. रु. 5000 कडे त्याचा प्रवास सुरू झाला आहे.

Mattresses आणि Foam products मधील भारतातील सुप्रसिद्ध कंपनी, Sleepwell या प्रथित यश ब्रँडची owner शिला फोमने याच क्षेत्रातील दुसरी प्रसिद्ध कंपनी र्घीीश्रेप अधिग्रहीत केली. सव्वा चार टक्क्यांनी वाढून शिला फोमचा शेअर शुक्रवारी 1215 वर बंद झाला.

रिलायन्स इंडस्ट्रीज आणि Jio Financial Services चे बहुचर्चित De-merger गुरुवारी पार पडले आणि Jio चा भाव रु. 261.85 असा नक्की झाला. ‘दि इकॉनॉमिक टाइम्स’ने गळे Jio Financial Services चे वर्णन मुकेश अंबानींचा New chocolate Boy असे केले आहे.

याच मालिकेतील मागील एका लेखात Golden Crossover ¶m vBullish Technial Pattern चा उल्लेख केला होता. ट्रेडर्स आणि इन्हवेस्टर्स या पॅटर्नला अतिशय विश्वसनीय मानतात. जेव्हा 50 days mocing average ची रेषा 20 days mocing average च्या रेषेला छेदून वरच्या दिशेने जाऊ लागते तेव्हा हा पॅटर्न अस्तित्वात येतो. शुक्रवारी निफ्टी 50 ITC, Indusind Bank, Jsw Steel, Kotak Manindra Bank, LTI Mindtree, L & T, M & M, Maruti Suzuki, NTPC, Nestle या शेअर्सनी गोल्डन क्रॉसओव्हर केला आहे.

स्टर्लिंग & विल्सन रिन्यूएबल एनर्जी (Swsolar) चा शेअर सुमारे 25 टक्क्यांनी वाढून शुक्रवारी रु. 367 वर बंद झाला. इतकेच नाही, तर 60 हजारच्याही आत असणारा त्याचा सरासरी व्हॉल्यूम साडेआठ लाखांवर गेला. खरे म्हणजे सातत्याने तोटा दर्शवणारी ही कंपनी सोलर एनर्जी उत्पादक कंपन्यांना इंजिनिअरींज, प्रोक्यूअरमेंट आणि कन्स्ट्रक्शन सेवा पुरवते. जगभर तिचा विस्तार आहे. कंपनीची बूक व्हॅल्यू, सेल्स ग्रोथ, आरओई सर्व काही Negative आहे. प्रवर्तकांनी त्यांच्याकडचे 40 टक्के शेअर्स गहाण ठेवले आहेत. मूळ Shapoorji Pollonji Group या प्रवर्तकांकडून रिलायन्सने 40 टक्के शेअर्स खरेदी केले.

आता या आठवड्यात शेअरमध्ये तेजी येण्याचे कारण म्हणजे आगामी वर्षात कंपनीकडे असणारी प्रचंड ऑर्डस बुकिंग आणि त्या धर्तीवर कंपनीचा तोटा भरून काढण्याचा विश्वास इथून पुढे या कंपनीची Growth Story सुरू होईल. असा बाजारात मतप्रवाह आहे. सरकारचाही Renewable Energy सेक्टरला Boost देण्याचा निर्धार आहे. ज्यांचा High Risk-High Reward स्टॅ्रटेजीवर विश्वास आहे. त्यांच्यासाठी आज हा शेअर एक चांगली संधी आहे.

 

Back to top button