नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : वाढती महागाई, खाद्यान्नावर लावण्यात आलेला जीएसटी कर, तपास संस्थांचा कथित दुरूपयोग आदी मुद्यांवरून विरोधी पक्षांनी संसदेत घेतलेला आक्रमक पवित्रा कायम असून, वरील मुद्यावरून घातलेल्या गदारोळामुळे आज (दि. २७) लोकसभेचे कामकाज वाया गेले.
सकाळी अकरा वाजता लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आपल्या मागणीसाठी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यामुळे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज प्रथम दुपारी बारा वाजेपर्यंत आणि त्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केले. सदनात फलक दाखविणाऱ्या काँग्रेसच्या चार खासदारांचे बिर्ला यांनी दोन दिवसांपूर्वी निलंबन केले होते. हे निलंबन मागे घेण्याची मागणीही विरोधक करीत होते.
हेही वाचा :