#soyabean : सोयाबीनचे दर पडलेत, शेतकऱ्यांनो व्यक्त व्हा! सोशल मीडियात ट्रेंडच्या माध्यमातून एल्गार

#soyabean
#soyabean
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन ; संदीप शिरगुप्पे : #soyabean : देशातील हंगामी महत्वाचे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. दरम्यान मागील आठवड्यात सोयाबीनची आयात केल्याने देशातील सोयाबीनचा (#soyabean) दर अचानक तीन ते चार हजार रुपयांनी घसरला.

सोयबीन काढण्याचा हंगाम सुरू असताना हे दर पडल्याने सरकार विरोधात शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. यावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मिळून सोशल मीडीयावर ट्रेंड सूरू केला आहे. याला हजारो शेतकऱ्यांनी प्रतिसाद आहेत.

मागच्या चार दिवसांपूर्वी १० हजार प्रती क्विंटल सोयाबीनचा दर होता. काल त्यात मोठी घसरण होवून प्रती क्विंटल ५५०० ते ५७०० दर झाला आहे. तब्बल ४० ते ५० % दर पडले आहेत. मागील आठवड्यात १५ लाख मेट्रिक टन सोयाबीन आयात केले आहे. याला महाराष्ट्र सरकारने लेखी विरोध केला. त्यातच खाद्यतेल आयात शुल्क कमी करण्यात आले आहे. त्याचबरोबर सोयापेंड १२ लाख टन आयात करण्यात आली. या कारणांमुळे सोयाबीनचे दर गडगडले आहेत.

२०१९ साली आलेला महापूर आला यातून शेतकरी थोडा सावरतोय तोवर कोरोना महामारीने शेतकऱ्याचे पुन्हा कंबरडे मोडले.याचबरोबर शेतमाल पिकवण्यासाठी लागणारी खते, बियाणे, औषधे, औजारे, यंत्र, ते यंत्र चालण्यासाठी लागणारे इंधन (डिझेल) यांचे भाव गगनाला भिडले आहेत. याचबरोबर २०२१ साली पुन्हा महापुराने थैमान घातले. अशातच टोमॅटोचे दर घसरले. शेतकऱ्यांनी रस्त्यावर टोमॅटो फेकून दिला.

भुईमूगाच्या शेंगाचाही बाजार असाच पडला होता. मात्र शेंगतेलाचं दर मात्र दिवसेंदिवस चढेच होते. सध्या सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

#सोयाबीन हा ट्रेंड

सोयाबीनचे दर घसरल्याने त्यावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज (ता.२३) संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत सोयाबीन ट्रेंड सोशल मीडियात सुरु आहे. यामध्ये कृपया सर्वांनी सामील व्हावे, असे आवाहन शेतकरी मित्रांनी केले आहे.

सोयाबीन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडा, उपाय सुचवा, योग्य भाव मिळण्यासाठी सरकारला धारेवर धरा. तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा तुम्ही कोणत्याही विचारधारेचे असा पण आपल्या बापाच्या हक्कासाठी Twitter, Facebook, insta, what's up अशा सगळ्या माध्यमांतून लिहते व्हा ! व्यक्त व्हा ! असा संदेश या ट्रेंडच्या माध्यमातून देण्यात येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news