Pranitha Subhash : प्रणिताने पतीच्या पायात बसून केली पूजा, भडकले नेटकरी

pranitha subhash
pranitha subhash
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रणिता सुभाष चर्चेत आली आहे. याचे कारण अभिनेत्रीचा कोणताही नवा चित्रपट नसून वैयक्तिक आयुष्य आहे. तिने तिच्या सोशल अकाऊंटवर पती नितीन राजूसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. यावर नेटकरी भडकले असून हा फोटो पाहून संताप व्यक्त केला जात आहे. या फोटोत प्रणिता आपल्या पतीसोबत दिसत आहे. पण ती आपल्या पतीच्या पायाशी बसून पूजा करत आहे. ही गोष्ट अनेकांना आवडली नाही.

प्रणिता सुभाषने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पती नितीन राजूसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रणिताचा पती खुर्चीवर बसला असून प्रणिता पतीच्या पायाजवळ बसलेली दिसत आहे. त्याच्यासमोर पूजेचे ताट ठेवलेले असते आणि त्यात दिवा दिसतो. तिने पांढऱ्या रंगाचा सलवार सूट घातला असून ती आपल्या पतीची पूजा करताना दिसत आहे.

अनेकांना अभिनेत्री प्रणिताचे हे कृत्य आवडले नाही आणि त्यामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका करायला सुरुवात केलीय. प्रणिता तिच्या चित्रपटांमध्ये खूपच वेगळी असते. परंतु वैयक्तिक जीवनातील तिचे हे कृत्य लोकांना आवडलेले नाही. या प्रकरणावर अद्याप अभिनेत्री प्रणिताकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news