पुणे
पिंपरी : अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल
पिंपरी : दहा वर्षीय अल्पवयीन मुलावर दोघांनी मिळून लैंगिक अत्याचार केला. ही घटना धक्कादायक घटना बुधवारी (दि. 3) सायंकाळी पिंपरी परिसरात घडली. या प्रकरणी स्वप्नील शिंदे (25) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पीडित मुलाच्या 31 वर्षीय आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा 10 वर्षीय मुलगा मित्रांसोबत खेळत होता. त्यावेळी आरोपींनी त्याला रिक्षात बोलावून अश्लील चाळे केले. दरम्यान, मुलाने आरडाओरडा केल्याने इतर मुले रिक्षाजवळ आली. त्यानंतर आरोपींनी मुलाला सोडून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

