Sourav Ganguly Biopic : गांगुलीच्‍या ‘बायोपिक’मध्‍ये रणबीर कपूर साकारणार मुख्य भूमिका ? सौरव म्‍हणाला…

Sourav Ganguly Biopic : गांगुलीच्‍या ‘बायोपिक’मध्‍ये रणबीर कपूर साकारणार मुख्य भूमिका ? सौरव म्‍हणाला…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्यानंतर आता 'दादा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौरव गांगुली याच्या आयुष्यावर हिंदी चित्रपट बनवण्यात येणार आहे. 'लव फिल्म्स'कडून या बायोपिकची निर्मिती केली जाईल. सौरव गांगुली बायोपिकच्या पटकथेला अंतिम रूप देण्यासाठी मुंबईत उपस्थित होता. सूत्रांच्या माहितीनुसार, हा २०० ते २५० कोटी रुपयांचा बिग बजेट चित्रपट असेल. या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. (Sourav Ganguly Biopic)

रणबीर कपूर मुख्य भूमिका साकारणार? (Sourav Ganguly Biopic)

सौरव गांगुलीच्या बहुप्रतिक्षित बायोपिकसाठी सज्ज आहे. याबाबत सौरव गांगुलीने काही दिवसांपूर्वीच खुलासा केला होता. (Sourav Ganguly on his Biopic) सूत्रांच्या माहितीनुसार, सौरव गांगुलीची भूमिका रणबीर कपूर साकारणार असल्‍याची चर्चा आहे. सौरव गांगुली याबाबत म्हणाले, "याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. मला आशा आहे की, आम्ही लवकरात लवकर सकारात्मक बातमी शेअर करू."

९ सप्टेंबर २०२१ रोजी, लव फिल्म्स आणि सौरव गांगुली यांनी संयुक्तपणे बायोपिकची घोषणा केली होती. दोन वर्षे काम केल्यानंतर स्क्रीप्ट जवळपास तयार झाली आहे. परंतु, सौरव गांगुलीकडून सुधारणा करणे बाकी आहे. सौरवला बायोपिकची घाई नाही. चित्रपटात सौरव गांगुलीचा संपूर्ण प्रवास दाखवण्यात येईल, असे बोलले जात आहे. (Sourav Ganguly Biopic)

भारतीय क्रिकेटपटू ते बीसीसीआय अध्यक्षापर्यंतचा प्रवास

एक तरुण क्रिकेटपटू आणि भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार, त्यांनतर लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजय मिळवण्यापासून शेवटी बीसीसीआयचे अध्यक्ष बनण्यापर्यंत प्रवास या चित्रपटात दाखवण्यात येईल. सौरव गांगुलीची दोन दशकांची शानदार कारकीर्द आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असल्याचे श्रेय त्याला दिले जाते. त्यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. क्रिकेट चाहत्यांसाठी ते नेहमीच दादा राहतील आणि त्यांच्या हृदयात त्यांचे नेहमीच खास स्थान असेल. त्याचे आयुष्य मोठ्या पडद्यावर उलगडताना पाहणे मनोरंजक असेल. (Sourav Ganguly on his Biopic)

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news