पुढारी ऑनलाईन डेस्क : 'चांद्रयान-३'ने बुधवारी संध्याकाळी ६.०४ वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या सॉफ्ट लँडिंग केले आणि त्यानंतर संपूर्ण देश आनंदसागरात बुडून गेला. या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधून आज काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष एस. सोमनाथ यांना पत्र लिहून सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी देखील आज बेंगळुरू येथे इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या टीमचे भेट घेवून अभिनंदन केले. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांचा त्यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
सोनिया गांधी यांनी या पत्रामध्ये इस्रोच्या शानदार कामगिरीमुळे आनंद झाल्याचे म्हटले आहे. त्या पुढे म्हणाल्या की, "सर्व भारतीयांसाठी, विशेषतः तरुण पिढीसाठी ही अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. इस्रोची उत्कृष्ट क्षमता अनेक दशकांमध्ये विकसित करण्यात आली आहे. त्यात उल्लेखनीय नेत्यांचे यागदान आहे. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांच्या भावनेने त्यांना नेहमीच प्रेरणा दिली आहे. हे साठच्या दशकाच्या सुरुवातीपासून स्वावलंबनावर आधारित आहे. ज्याने त्याच्या मोठ्या यशात योगदान दिले आहे. मी संपूर्ण इस्रो टीमला शुभेच्छा देतो," असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :