Social Media Harms : सोशल मीडियाचा अतिरेक मानसिक आरोग्यासाठी ठरतो ‘धीमे विष’!

Social Media  Harms : सोशल मीडियाचा अतिरेक मानसिक आरोग्यासाठी ठरतो ‘धीमे विष’!
Published on
Updated on

बर्लिन : गरजेपुरता सेलफोन, इंटरनेट किंवा सोशल मीडियाचा वापर करणे हे फायद्याचेच ठरत असते; पण अनेक लोक सोशल मीडियाच्या आहारीच जातात. कोरोना महामारीच्या काळात तर सोशल मीडियाचा वापर अनेक पटीने वाढला. सध्याच्या डिजिटल युगाचा आपल्या आरोग्य व जीवनावर अनेक प्रकारे प्रभाव (Social Media Harms) पडत आहे. आता संशोधकांनी म्हटले आहे की सोशल मीडियाचा अतिरेक हा मानसिक आरोग्यासाठी 'स्लो पॉयझन' म्हणजेच 'धीम्या विषा'सारखेच ठरते!

Social Media Harms : सोशल मीडियाच्या आहारी

जर्मनीतील बोचम येथील रूहर युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी मीडिया प्लॅटफॉर्मच्या वाढत्या वापराबाबत संशोधन केले आणि या बदलाचा मानवी जीवनावर किती परिणाम झाला आहे याची माहिती मिळवली. 'मेडिकल न्यूज टुडे'च्या मते, या संशोधनाचे नेतृत्व विद्यापीठाच्या सेंटर फॉर मेंटल हेल्थ रिसर्च अँड ट्रीटमेंट'मधील सहायक प्राध्यापिका ज्युलिया ब्रायलोसावस्काया यांनी केले.

या संशोधनातून अनेक गोष्टी समोर आल्या. संशोधकांनी म्हटले आहे की मानसिक आरोग्य हे सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन परस्परसंबंधित पैलूंवर अवलंबून असते. सोशल मीडियाचा अतिवापर केल्याने परस्पर बंध कमकुवत होतात आणि एखाद्या व्यक्तीच्या मनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news