Sextortion : ‘सेक्स्टॉर्शन’चा तरुणाईला विळखा! सोशल मीडियाचा गैरवापर

Sextortion : ‘सेक्स्टॉर्शन’चा तरुणाईला विळखा! सोशल मीडियाचा गैरवापर
Published on
Updated on

सांगली; विवेक दाभोळे :  सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी तरुणींकडून तरुणांना, जाळ्यात ओढून ब्लॅकमेल आणि बदनाम करण्याचा 'सेक्स्टॉर्शन'(Sextortion) चा नवीन फंडा रुजू लागला आहे. या विळख्यात तरुणाई अलगद अडकू लागली आहे.

Sextortion : सेक्स्टॉर्शन म्हणजे

सेक्स्टॉर्शनचे बळी होण्यापासून सावध राहणे आताच्या काळात गरजेचे आहे. आता सायबर फसवणूक करणारे गुन्हेगार सेक्स्टॉर्शनकडे वळले आहेत. पुरावा उघड करण्याची धमकी देऊन, एखाद्याकडून पैसे उकळण्याची किंवा लैंगिक इच्छेची मागणी यात केली जाते. विशेष म्हणजे यात महिला गुन्हेगार 'कॅमेर्‍या'च्या मागे आहेत. सायबर 'क्रिमिनल्स'आता केवळ पुरुषच आहेत, असे नाही; तर अनेकवेळा काही महिलाही याचा गैरफायदा घेत आहेत.

सेक्स्टॉर्शन म्हणजे लैंगिक खंडणी होय. हा एक ब्लॅकमेलचाच प्रकार आहे. गुन्हेगारांकडून या माध्यमातून लैंगिक अनुकूलता, पैसे किंवा इतर स्वरूपाची मागणी केली जाते, यासाठी वेठीस धरले जाते. यात गुन्हेगारांकडे समोरच्याशी काही तडजोड करण्यास भाग पाडू शकतील, अशा आक्षेपार्ह छायाचित्रांचा संच, व्हिडिओ असतात. समोरच्याने जर अपेक्षित प्रतिसाद दिला नाही, तर 'मटेरियल' ऑनलाईन प्रकाशित करण्याची किंवा मित्र, कुटुंबातील सदस्य किंवा सहकार्‍यांसोबत शेअर करण्याची धमकी दिली जाते.

Sextortion : सेक्स्टॉर्शन ची सुरुवात 

सेक्स्टॉर्शनची सुरुवात साधारणपणे अनोळखी तरुणींकडून सोशल माध्यमात फ्रेंड रिक्वेस्टने होते. नागरी तसेच ग्रामीण भागातदेखील आता तरुणाई 'ऑनलाईन' असणे हे काही नवीन राहिलेले नाही. तरुण आपला बराचवेळ समाज माध्यमांवर घालवतात. यातूनच कुतूहल आणि उत्सुकतेने आलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली जाते. त्यानंतर साहजिकच चॅटिंगचा टप्पा सुरू होतो.
सुरुवातीला काही मेसेज आणि नंतर संभाषण, अधिक खासगी होत जाते. नंतर तर व्हॉट्स अ‍ॅप सुरू होते. यातून नंबर 'शेअर' होतो. कळत नकळत नंतरच्या गोष्टी वेगाने घडतात. काही बघायचे आहे का, अशी विचारणा तिकडून होते. बाथरूममध्ये जावा, सूचनांचे पालन करा, असे सांगण्यात येते. काही क्षणातच एक व्हिडीओ कॉल येतो. समोरचा इतका उत्साहित होतो की तो समोर कोण आहे, हेदेखील स्पष्टपणे पाहू शकत नाही, मात्र पाहण्याची उत्सुकता असते. यात काहीच क्षण जातात; पण खरी 'गेम' इथेच सुरू होते.
मात्र काही वेळातच तरुणाचा मोबाईल वाजतो आणि भयानक घटनाक्रम सुरू होतो. नुकत्याच एन्जॉय केलेल्या व्हिडीओ चॅटची रेकॉर्ड केलेली क्लिप कोणीतरी पाठवलेली असते. पैसे द्या अन्यथा क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिलेली असते. मात्र पैसे देऊन देखील अशा सेक्सटॉर्शनचा शेवट होतोच असे नाही. यासाठीच आता 'ऑनलाईन' असताना अखंड राहणे सावध हेच गरजेचे!

आता अशा या सेक्स्टॉर्शनच्या विळख्यात अनेक तरुण अलगद बळी पडू लागले आहेत. जिल्ह्यात अशा अनेक घटना घडत आहेत. एखादीच रेकॉर्डवर येते. अनेक घटना 'रेकॉर्ड'वर येत नाहीत, पण म्हणूनच याचे गांभीर्य वाढत राहिले आहे. कोरोना काळापासून असे प्रकार सुरू झाले. लॉकडाऊनच्या काळात अनेकजण 'ऑनलाईन' असतात, यातून सारा घटनाक्रम बिघडत गेला. अशा अनेक घटना घडल्या.

समाजात अशा अनेक घटना घडत आहेत. प्रामुख्याने पैसेवाल्या कुटुंबातील मुले – तरुण, चांगले नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक अशांना यात ओढल्याच्या घटना होत आहेत. भीती, बदनामी टाळण्यासाठी यातून मागेल तेवढे पैसे दिले जातात.
मात्र या सार्‍याच प्रकाराची आता पोलिसांच्या सायबर सेलने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. त्या दृष्टीने आता प्रबोधनाचीदेखील गरज जाणकारांतून व्यक्त होत आहे.

  • अनोळख्या व्यक्तीची विशेषत: अनोळखी तरुणींची फ्रेंड रिक्वेस्ट कदापि स्वीकारू नका
  • परिचित नसल्यास व्हॉट्स अ‍ॅप कॉलवर अजिबात संवाद साधू नका
  • व्हिडिओ, छायाचित्र शेअर करताना, पाठवताना विचार करा.
  • मैत्रिणीला किंवा पोलिसांना तातडीने कल्पना द्या

हे लक्षात घेणे गरजेचे..

आता स्मार्ट मोबाईल नवीन राहिलेला नाही. मनोरंजन, कामाच्या निमित्ताने सोशल माध्यमांचा वापर वाढता राहिला आहे. अशा 'ऑनलाईन' तरुणांना हेरून सायबर गुन्हेगार पाळत ठेवतात. 'ऑनलाईन' मैत्री करण्याचा प्रयत्न करतात. यातून सावज अलगद त्यांच्या जाळ्यात अडकते. यामुळे आता सोशल मीडियाचा वापर करताना कमालीचे गांभीर्य गरजेचे आहे. सोशल मीडियावर ओळख करणे, या मैत्रीचे एका भावनिक नात्यात परिवर्तन करणे आणि हळूहळू पैसे उकळणे अशा घटनांना यातूनच खतपाणी मिळू लागले आहे. या सार्‍याच घटना गंभीर आणि समाजमनाच्या स्वास्थ्याला तडा देणार्‍या निश्चितपणे ठरत आहेत म्हणूनच त्याचे गांभीर्य अधिक राहतेय!

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news