आंबोलीतील गोगलगाईची दुर्मिळ प्रजात गोव्यात आढळली

आंबोलीतील गोगलगाईची दुर्मिळ प्रजात गोव्यात आढळली
Published on
Updated on

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोवा विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र ज्ञानशाखेच्या संशोधकांना गोव्यातील नेत्रावळी अभयारण्यात भारतीय हेलिकॅरिओनोइडिया वंशाची दुर्मिळ प्रजात दिसली आहे. गोगलगाईची ही प्रजात 'Varadia amboliensis' या नावाने ती ओळखली जाते. गोगलगायींचा समावेश मृदुकाय (मॉलस्का) संघाच्या उदरपाद (गॅस्ट्रोपोडा) वर्गात होतो. गोगलगाईंच्या शरीरावर असणारे शंख सदृश्य कवच वैशिष्ट्यपूर्ण असते. ठाकरे वाईल्डलाईफच्या संशोधकांनी ही प्रजाती पश्चिम घाटातून शोधली होती.

कवचधारी गोगलगायींना 'स्नेल', तर कवचरहित गोगलगायींना 'स्लग' म्हणतात. स्नेल गोगलगायीं आपले संपूर्ण शरीर कवचात आकसून घेऊ शकते. यातील अर्ध-गोगलगाय उत्तर आणि मध्य पश्चिम घाटातील जंगलामध्ये मध्ये सापडतात. भारताच्या पश्चिम घाटातील ५१ जिवंत प्रजातींमध्ये समावेश आहे.

या गोगलगाईंची राहण्याची ठिकाणे अधिवास, आकार, वर्तन, बाह्यरचना आणि आंतररचना यामध्ये विविधता आढळते. विस्तारित शरीर, आवरण वगळता एकूण प्रौढ शरीराची लांबी 4.8 ते 6.9 से.मी. पर्यंत असते. इतर गोगलगायींप्रमाणे ही सुद्धा आपल्या स्नायुपादातून श्लेष्म स्रवत घसरत पुढे सरकते. यामुळे तिच्या प्रवासप्रक्रियेत घर्षण कमी होते. ही गोगलगाय चमकदार राखाडी, सफेद-राखाडी रंगाची आहे.

नवीन वंशाच्या आकारविज्ञानानुसार तिचे डोके आणि तुटल्यासारखी दिसणारी शेपटी, दोन्ही गडद राखाडी रंगाचे आहेत. पाठीवरील आकर्षक कवच-शेल हे पातळ, चकचकीत सोनेरी-तपकिरी, लाल पिवळा अश्या रंगाचे असल्याने लक्षवेधी ठरते.

या पाच ठिकाणी अधिवास

संपूर्ण भारतात सध्या केवळ पाचच ठिकाणी या गोगलगाईची प्रजाती आढळत होती. हिरण्यकेशी मंदिर (सिंधुदुर्ग), आंबोली वन उद्यान (सिंधुदुर्ग), आंबोली धबधब्याजवळ, (सिंधुदुर्ग) कोडली, कोल्हापूर आणि कर्नाटक राज्यात याना वन परिसरात ही प्रजाती दिसत होती.

गोवा विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र ज्ञानशाखेचे डॉ. नितीन सावंत, मयूर गावस, शुभम राणे, सागर नाईक या गोमंतकीय संशोधकांनी गोव्यात प्रथमच गोगलगाईची दुर्मिळ प्रजात शोधून त्याचे सखोल संशोधन करायला सुरुवात केली आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : चला पाहूया आदेश बांदेकरांच्या घरचा गणपती | Ganesh Festivel Special

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news