सिंधुदुर्ग : कुडाळ नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा!

NP KUDAL
NP KUDAL

कुडाळ : पुढारी वुतसेवा : कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांची निवड झाली आहे. नगराध्यक्षपदी आफरीन करोल तर उपनगराध्यक्षपदि मंदार शिरसाट यांची निवड झाली. महाविकास आघाडीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी यावेळी फटाके फोडून, घोषणा देत आनंद व्यक्त केला. नगरपंचायत समोरील रोडवर शिवसेना-भाजप पदाधिकारी कार्यकत्यामध्ये आ. वैभव नाईक यांची गाडी शिवसेना-काँग्रेस नगरसेवकांना घेवून आत आल्याने शाब्दिक बाचाबाची झाली होती. यावेळी पोलिसांनी दोन्ही गटांना थोपविण्यासाठी लाठीचार्ज केला. पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी सर्वच पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना शंभर मीटर बाहेर काढल्यानंतर नगरपंचायत परिसर शांत झाला.

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आफरिन करोल यांना ९ मते, तर भाजपच्या प्राची बांदेकर यांना ८ मते मते पडून सौ. आफरिन करोल विजयी झाल्या. तर उपनगराध्यक्षपदी मंदार शिरसाट ९ मते तर भाजपच्या सौ. प्राची बांदेकर यांना ८ मते पडून मंदार शिरसाट विजयी झाल्या. निवडीनंतर महाविकास आघाडीकडून फटाके फोडून, घोषणा देत परिसर दणाणून सोडला. कुडाळ नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणुकीच्या पाश्वभूमीवर शिवसेना-काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत झाली.

महाविकास आघाडीकडे ९ तर भाजपकडे ८ सदस्य आहेत. शिवसेना ७ व काँग्रेस २ असे मिळून ९ सदस्य होत होते, तर भाजपकडे ८ सदस्य आहेत. दोन्ही बाजुकडून नगराध्यक्ष आपलाच होणार असल्याचा दावा केला जात होता. शिवसेना-काँग्रेस महाविकास आघाडीकडुन आफरिन करोल तर भाजपकडून प्राची बांदेकर रिंगणात उभ्या होत्या. तर उपनराध्यक्ष पदासाठी महाविकाआघाडीकडून शिवसेना गटनेते मंदार शिरसाट तर भाजपकडुन निलेश परब यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अखेर अपेक्षित संख्याबळाप्रमाणे महाविकास आघाडीची सत्ता आली. सत्ता येताच महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

हेही वाचलतं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news