Sikkim flash flood : मृतांची संख्या २२, चार लष्करी जवानांचा समावेश ; १०० बेपत्ता

Sikkim floods Update
Sikkim floods Update

पुढारी ऑनलाईन : उत्तर सिक्कीम जिल्ह्यातील ल्होनक सरोवरवर झालेल्या ढगफुटीमुळे आलेल्या महापुरातील मृतांची संख्या २२ झाली असून यात चार लष्करी जवानांचा समावेश आहे. तर १००च्यावर लोक अजूनही बेपत्ता आहेत. अल्प वेळेत पडलेल्या मुसळधार पावसामुळे तिस्ता नदीला पूर आला होता, यात अनेक घरं वाहून गेली होती. ही बातमी इंडिया टुडेने दिली आहे.

उत्तर सिक्कीममधील चुंगथांग या परिसराला सर्वाधिक फटका बसला असून या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे जवान अजूनही पोहचू शकलेले नाहीत. अजूनही या परिसराचा संपर्क तुटलेला आहे. लष्करी जवानही बचाव कार्यात कार्यरत आहेत. पण चिखल, वाहणारे पाणी अशा विविध समस्यांमुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. लष्कराने वाहून गेलेली तीन वाहने नदीतून बाहेर काढली आहेत.

तीन दिवसांपूर्वी तिस्ता नदीला पूर आला, त्यामुळे ल्होनाक सरोवरात कमी वेळात मोठ्या प्रमाणावर पाणी आले, हे पाणी नंतर चुंगतांग धरणात आले, त्यामुळे वीजनिर्मित प्रकल्प मोडकळला. त्यातून हे पाणी धरणाच्या खालच्या बाजूला असलेल्या गावे पुराच्या पाण्यात सापडली. या पुरात १३ पूल कोलमडून पडले आहेत, यात ८ पूल मंगान जिल्ह्यातील आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news