Pune News : डीजेची लेझर लाइट डोळ्यांच्या मुळावर! पुण्यात तरुणाच्या डोळ्याची दृष्टी अधू

Pune News : डीजेची लेझर लाइट डोळ्यांच्या मुळावर! पुण्यात तरुणाच्या डोळ्याची दृष्टी अधू
Published on
Updated on

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे आणि लेझर लाईट्सचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. या लेझर लाईटमुळे जनता वसाहत परिसरात राहणाऱ्या एका तरुणाच्या डोळ्याच्या रेटिनाला गंभीर इजा होऊन त्याच्या काही अंशी अंधत्व आले आहे. अशी माहिती सिंहगड रोडवरील दूधभाते नेत्रालयाचे सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. अनिल दूधभाते यांनी मंगळवारी पत्रकार परिषद दिली.

अनिकेत (वय 23 रा. जनता वसाहत) असे दृष्टीने अधू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अनिकेत मिरवणुकीच्या दिवशी पर्वती पायथा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला होता. नाचत असताना डिजेवरील हिरवा लेजर लाईट त्याच्या एका डोळ्यावर पडला. यावेळी त्याला डोळ्याला काही वेदना किंवा आग झाली नाही परंतु, त्याची दृष्टी मात्र अंधुक झाली. त्याच्या एका डोळ्याची दृष्टी जवळपास 30 टक्क्याने कमी झाल्याचे अनिकेतने सांगितले.

यानंतर अनिकेत सिंहगड रस्त्यावरील दूधभाते नेत्रालयात गेला. येथे त्याला नेत्ररोगतज्ञ डॉ. अनिल दूधभाते यांनी उपचार केले. याबाबत अधिक माहिती देताना डॉ. दूधभाते म्हणाले की आमचे सेंटर अत्याधुनिक साधनांनी डोळ्याच्या सर्व प्रकारच्या उपचारासाठी सज्ज आहे. अनिकेतच्या डोळ्यावर लेजर लाईट पडल्याने त्याच्या नेत्रपटलावर रेटिना वर बर्न झाले आहे. आता त्याच्यावर उपचार सुरू असून तो बरा होत आहे असे डॉ. दुधभाते यांनी स्पष्ट केले.

अनंत चतुर्दशीला गणेशोत्सव मिरवणूक मोठ्या आनंदात पार पडली. आपल्या लाडक्या गणरायाला भक्तांनी आनंदात विसर्जित केलं. यामध्ये ढोल ताशासह आता सध्या डीजे चा ट्रेंड पडला आहे. याच्या गजरात नाचत, थिरकत गणपती बाप्पा ला निरोप दिला गेला! पण, यामध्ये झालेला लेजर लाईट चा वापर हा तरुणांच्या डोळ्यांना घातक ठरत आहे.

काय आहे लेझर बर्न?

या हिरव्या लेझर लाईटची फ्रिक्वेन्सी खूप जास्त असते. जे युवक त्या लेझर फ्रिक्वेन्सीच्या 'फोकल लेंग्थ' वर आले किंवा त्यांचे नेत्रपटल आले त्यांना असे या त्रासाला सामोरे जावे लागते. आपण लहानपणी भिंग घेऊन ज्या प्रमाणे ऊन्हात कागद पेटवायचो तसाच प्रकार या लेसर ने या तरुणाई वर केला होता.

अनिकेत सारखे अनेक रुग्ण असतील तर त्यांनी तातडीने नेत्ररोग तज्ञाला दाखवावे.या सगळ्या तरुणांना झालेला नेत्रपटल दोष त्यांच्या शिक्षणावर आणि करीअर साठी किती भयावह असेल याची कल्पना करवत नाही. त्यासाठी हा लेझर लाईट टाळावा. या लेझर वापरावर बंदी आणण्याची गरज आहे. नाही तर याचे भयंकर परिणाम पुढील नवरात्र आणि दिवाळीतही दिसतील आणि कित्येक निष्पाप लोकांची नजर यात जाईल.

– डॉ. अनिल दुधभाते, दुधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटर, सिंहगड रोड

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news