

न्यूयॉर्क : चंद्र भाकरीसारखा गोल आहे, प्रकाशाप्रमाणे चमकता आहे. बर्फासारखा थंडगार आहे आणि पांढरा शुभ्र आहे, असे लहानपणापासूनच आपली कल्पना राहात आली आहे. चंद्राला अनेक उपमाही दिल्या गेल्या. पण चंद्रावर पोहोचल्यानंतर तो तर बराच वेगळा असल्याची कल्पना आली. ना बिलकुल गोल, ना बिलकुल बर्फासारखा थंड, ना चेहर्याने सुंदर असा हा चंद्र असल्याची प्रचिती त्यावेळी आली. मात्र, अलीकडेच 'नासा'ने इन्स्टाग्रामवर चंद्राचे असे छायाचित्र शेअर केले आहे, जे आपल्या सर्वांच्या कल्पनेपेक्षा खूपच वेगळे आहे. हे छायाचित्र आपल्याला चंद्राच्या उपग्रहावरून आलेल्या छायाचित्रापेक्षाही बरेच वेगळे आहे.
नॅशनल अॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन अर्थात 'नासा'ने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चंद्राचे एक खास छायाचित्र शेअर केले आहे. या छायाचित्रात चंद्र चक्क शनिसारखाच दिसत असल्याचे अधोरेखित होते. ही आतापर्यंतची चंद्राची सर्वात अद्भूत छबी मानली जाते. हे छायाचित्र पोस्ट करताना 'नासा'ने म्हटले आहे, रैवियोली पास्ता, एमपैनाडा? आपण नेमके काय पाहात आहात? चुकीचे उत्तर देऊ नका!
हे छायाचित्र कॅसिनी स्पेसक्राफ्टमधून घेतले आहे. आता हे देखील येथे नमूद करण्यासाठी आहे की, हा आपला चंद्र नाही तर तो आहे शनी ग्रहाची प्रदक्षिणा घालत असणारा पॅन नावाचा चंद्र. शनीच्या कक्षेतील सर्वात आतील चंद्र पॅन नावाने ओळखला जातो. या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, पॅन नावाच्या या चंद्राचा शोध एम. आर. शोवॉल्टर यांनी 1990 मध्ये लावला होता आणि त्याचे छायाचित्र व्होयेजर 2 वरून घेतले गेले होते. हा शनी ग्रहाभोवती फिरणारा एकमेव ज्ञात चंद्र आहे, जो 13.8 तासांत आपल्या कक्षेभोवती एक फेरी पूर्ण करतो. स्पेस डॉट कॉम वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, शनीभोवती फिरणारे 150 चंद्र आहेत आणि त्यापैकी 145 चंद्र संशोधकांना ज्ञात आहेत.