केवळ उच्‍च रक्‍तदाबच नाही, तर अति मीठ खाल्ल्याने होतात ‘हे’ आजार

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उच्च रक्तदाबाचा त्रास ( हाय ब्‍लड प्रेशर ) असणार्‍या रुग्णांना आहारात मीठ (Salt) कमी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. 'सेल मेटाबॉलिझम'मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार मीठ शरीराच्‍या मुख्य रोगप्रतिकारक नियामकांच्या कार्यामध्ये व्यत्यय आणू शकते. ( Eating Too Much Salt) त्‍यामुळे आता अति प्रमाणात मिठाचे सेवन आरोग्यासाठी कसे हानीकारक आहे हे जाणून घेऊया….

जेवणात मीठ कमी असल्यास त्‍याची चव बिघडते, तसेच मीठ कमी पडले तरी चव खराब होतेच, शिवाय चवही बिघडते. आरोग्य यामुळेच उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना जेवणात मीठ कमी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. आहारात जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने व्यक्ती उच्च रक्तदाबाचा रुग्ण बनू शकते. अशा परिस्थितीत अन्नामध्ये जास्त मीठ घालणे टाळावे आणि शिजवलेले अन्न वर मीठ टाकून खाणे टाळावे, असाही सल्‍ला दिला जातो.

हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढण्‍याची शक्‍यता

जास्त प्रमाणात मीठ सेवन केल्याने हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढू शकतो. हृदय निरोगी ठेवण्यासाठी अन्नामध्ये मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवा. जर तुम्ही दररोज पाच ग्रॅमपेक्षा कमी मीठ वापरत असाल तर ते तुम्हाला हृदयविकार, स्ट्रोक आणि कोरोनरी हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यास मदत करू शकते.

Eating Too Much Salt : डिहायड्रेशनचा त्रास होण्‍याचा धोका

जेवणात जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने शरीराला डिहायड्रेशनचा ( शरीरामध्ये पाण्याची कमतरता ) त्रास होऊ शकते. डिहायड्रेशनची समस्या टाळण्यासाठी अन्नामध्ये संतुलित प्रमाणात मीठ घाला आणि पुरेसे पाणी प्या, असाही सल्‍ला डाॅक्‍टर व आहार तज्ज्ञ देतात. जेव्हा शरीरात मिठाचे प्रमाण जास्त असते तेव्हा शरीरात अतिरिक्त पाणी जमा होते. या स्थितीला पाणी धारणा किंवा द्रव धारणा म्हणतात. ज्यामध्ये हात, पाय आणि चेहऱ्यावर सूज येण्याची समस्या सुरू होते.

किडनीचे आरोग्‍य चांगले राहण्‍यासाठी कमी मीठ खा

जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्याने किडनी खराब होऊ शकते आणि किडनी निकामी होऊ शकते. जास्त प्रमाणात मिठाच्या सेवनाने लघवीतील कॅल्शियमची पातळी वाढते, ज्यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढते, असेही नवीन
अभ्‍यासात नमूद केले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news