karnataka cm name | ब्रेकिंग : कर्नाटकचा तिढा अखेर सुटला! मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्रीपदी डी. के. शिवकुमार

karnataka cm name
karnataka cm name
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी अखेर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या (Congress leader Siddaramaiah) यांच्या नावावर काॅंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शिक्कामोर्तब केले आहे. तर कर्नाटक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.

याबाबतची अधिकृत घोषणा काॅंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आज गुरुवारी बंगळूरमध्ये करणार आहेत. दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत तीन दिवस दिवस चर्चेचा खल झाल्यानंतर सिद्धारामय्या यांचे नाव मुख्यमंत्रीपदी निश्चित करण्यात आले. काँग्रेसने कर्नाटकात भाजपला धक्का देत १३५ जागा मिळवल्या आहेत. स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण? याबाबत पेच निर्माण झाला होता. डी. के. शिवकुमार (Karnataka Congress president DK Shivakumar) यांनीही मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार तयारी केली होती. (Karnataka CM decision)

दरम्यान, दुसरीकडे बंगळूरच्या कंठिरवा स्टेडियममध्ये शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. हा शपथविधी सोहळा २० मे रोजी दुपारी १२.३० वाजता होणार आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्‍ये काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळाले. यानंतर मुख्‍यमंत्रीपदाची धुरा कोणाचा हाती येणार याकडे संपूर्ण राज्‍याचे लक्ष लागले होते. यावरून काँग्रेसमध्‍ये खलबते झाली. माजी मुख्‍यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशामध्‍यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार रस्‍सीखेच सुरू होती. पण बुधवारी रात्री खर्गे यांनी यावर तोडगा काढला.

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवकुमार यांच्याच नावांची चर्चा राहिली. शिवकुमार यांनी पक्ष नेतृत्वाने दिलेला तडजोडीचा प्रस्ताव फेटाळला होता. यामुळे पेच निर्माण झाला होता. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात टाकायची, यावर गेली तीन दिवस मंथन केले. पण बुधवारी रात्री यावर तोडगा निघाला.

सिद्धरामय्या यांनी काल सकाळी सव्वाअकराच्या सुमारास राहुल गांधी यांची '१० जनपथ' येथे भेट घेतली होती. जवळपास एक तास या नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती. यावेळी काही आमदारदेखील उपस्थित होते. या बैठकीनंतर डी. के. शिवकुमार यांनी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास राहुल यांची भेट घेतली. त्याआधी पक्षाचे वरिष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. दरम्यान, तोडग्याचे सारे प्रस्ताव शिवकुमार यांनी फेटाळले होते. ते मुख्यमंत्रिपद मलाच मिळावे म्हणून ठाम होते. हे पद न मिळाल्यास मी आमदार म्हणून पक्षाची व जनतेची सेवा करेन, असेही त्यांनी म्हटले होते. (karnataka cm name)

मुख्‍यमंत्रीपदाच्‍या निवडीसंदर्भात रविवारी (दि.१४) बंगळूर येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षाची (सीएलपी) बैठक झाली. काँग्रेसचे निरीक्षक सुशीलकुमार शिंदे, पक्षाचे सरचिटणीस जितेंदर सिंग, माजी सरचिटणीस दीपक बाबरिया यांच्या नेतृत्वाखाली रात्री राज्यातील सर्व आमदारांची बैठक झाली. बैठकीत सर्व आमदारांशी चर्चा करून त्यांची मते घेऊन विधिमंडळाचा गटनेता निवडून मुख्यमंत्री निवडला जाणार होता. पण या बैठकीत सर्व आमदारांनी सर्वानुमते मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हायकमांडने घ्यावा, असा ठराव करत सर्वाधिकार पक्षाध्यक्षांकडे सोपवण्याचा एका ओळीचा ठराव करण्यात आला होता.

"सोनिया गांधी आमच्या आदर्श आहेत. काँग्रेस हे प्रत्येकासाठी कुटुंब आहे. आपली राज्यघटना खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे आपण सर्वांचे हित जपले पाहिजे." असे डी. के. शिवकुमार यांनी मंगळवारी (दि.१६) दिल्लीला रवाना होण्यापूर्वी म्हटले होते. काँग्रेस पक्ष माझ्यासाठी आई आहे, मंदिर आहे. मला पक्षाच्या सरचिटणीसांचा फोन आला, दिल्लीला एकटेच या. मी एकटाच जात आहे. कर्नाटकातील जनतेने काँग्रेसला आशीर्वाद दिला आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रच राहायला हवे, असे माझे मत आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या.

काही माध्यमांमध्ये खासकरून वृत्तवाहिन्यांवर जर मुख्यमंत्रिपद मिळाले नाही, तर शिवकुमार राजीनामा देतील, अशा बातम्या झळकल्या होत्या. त्यावर संताप व्यक्त करीत शिवकुमार म्हणाले की, काँग्रेस पक्ष मला आईइतकाच प्रिय आहे. त्यामुळे जर कुणा वाहिनीने माझ्या राजीनाम्याच्या बातम्या दाखवल्या, तर त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा करू.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रारंभीची दोन वर्षे सिद्धरामय्या आणि नंतरची तीन वर्षे शिवकुमार, असा फॉर्म्युला ठरला आहे.

सिद्धरामय्या यांचा राजकीय प्रवास (Who is Siddaramaiah)

सिद्धरामय्यांचा जन्म देशाच्या स्वातंत्र्याच्या आधी १२ दिवस म्हणजेच ३ ऑगस्ट रोजी म्हैसूर जिल्ह्यातील टी. नरसीपुरा जवळील वरुणा होबळी येथील सिद्धरामनाहुंडी नावाच्या दुर्गम गावात सिद्धरामे गौडा आणि बोरम्मा यांच्या शेतकरी कुटुंबात झाला. त्यांना पाच भावंडे असून ते कुरुबा गौडा समाजातील आहेत.

दहा वर्षांचे होईपर्यंत त्याचे कोणतेही औपचारिक शिक्षण झाले नव्हते. पण त्यानंतर सिद्धरामय्या यांनी म्हैसूर विद्यापीठातून बीएससी आणि एलएलबी पर्यंतचे शिक्षण घेतले. सिद्धरामय्या यांनी म्हैसूरमध्ये चिक्काबोरैया यांच्याकडे ज्युनिअर वकील म्हणून आणि नंतर त्यांनी काही काळ कायद्याचे शिक्षक म्हणून काम केले.

ते आधी माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या JD(S) पक्षात होते. जेडीएस नेते म्हणून ते दोन वेळा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर ते काँग्रेसशी जोडले गेले. काँग्रेसचे बहुमताचे सरकार सत्तेवर आल्यानंतर १३ मे २०१३ ते १७ मे २०१८ दरम्यान ते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते.
सिद्धरामय्या १९८३ मध्ये पहिल्यांदा अपक्ष उमेदवार म्हणून कर्नाटक विधानसभेत निवडून गेले होते. १९९४ मध्ये ते जनता दल सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनले. एचडी दैवेगौडा यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी जेडीएसची साथ सोडून काँग्रेसचा हात धरला. २०१३ ते २१०८ दरम्यान त्यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. आतापर्यंत त्यांनी १२ निवडणुका लढवल्या आहेत. यातील ९ निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी गरिबांसाठी सुरु केलेल्या योजनांचे कौतुक करण्यात आले होते.

२०१३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रसने १२२ जागांवर विजय मिळवला होता. त्यावेळी मुख्यमंत्री निवडण्यासाठी काँग्रेसने गुप्त मतदानाचा अवलंब केल्यानंतर सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली होती. कर्नाटक सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून १३ वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news