पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) कर्नाटक प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांनी बुधवारी (दि. 17) मोठी घोषणा केली. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना जास्त वेळ लागणार नाही आणि ते लवकरच कर्नाटकच्या पुढील मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा करतील, असे त्यांनी जाहीर केले.
सुरजेवाला पुढे म्हणाले, खर्गे यांच्याकडून सध्या चर्चा सुरू आहे. काँग्रेस जेव्हा निर्णय घेईल तेव्हा आम्ही तुम्हाला कळवू. येत्या 48-72 तासांत कर्नाटकात नवे मंत्रिमंडळ स्थापन होईल, अशी माहितीही त्यांनी दिली. याबाबतचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने त्यांच्या ट्विटर अकौंटवरून दिली आहे.
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांचे नाव कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी निश्चित झाल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. त्यांचा शपथविधी उद्या (दि. 18) गुरुवारी होण्याची शक्यता आहे. ते उद्या एकटेच शपथ घेतील असे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. उद्या दुपारच्या जेवणानंतर शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे, असाहे अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुख्यमंत्रीपदाचे आणखी एक दावेदार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना नवीन सरकारमध्ये महत्त्वपूर्ण कॅबिनेट खात्यांसह उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आल्याचे समजते आहे.