Palak Tiwari : लग्न अजिबात करू नकोस; श्वेता तिवारीने दिला मुलीला सल्ला

palak and shweta
palak and shweta
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्वेता तिवारी ही टीव्हीवरील सर्वात स्टायलिश आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. श्वेताचे खूप चाहते आहेत. तिला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं आहे. (Palak Tiwari) श्वेताने प्रोफेशनल लाईफमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मात्र, अभिनेत्रीचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. श्वेताने दोनदा लग्न केले. पण दोन्ही वेळेस तिचे लग्न टिकले नाही. आता खुद्द अभिनेत्री श्वेता तिवारीने तिच्या तुटलेल्या लग्नांबद्दल उघडपणे बोलले आहे. तिने स्वत: तिची मुलगी पलक तिवारीला लग्न न करण्याचा सल्ला दिला आहे. (Palak Tiwari)

श्वेताचा लग्नावर विश्वास नाही…

श्वेता तिवारीने एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना लग्नाबाबत आपले मत मांडले आहे. श्वेता म्हणाली की, तिचा लग्नावर विश्वास नाही. ती मुलगी पलकलाही लग्न न करण्याचा सल्ला देते. श्वेता तिवारी म्हणाली- माझा लग्नावर विश्वास नाही. तीच गोष्ट मी माझ्या मुलीला सांगते की लग्न करू नकोस. हे तिचे जीवन आहे आणि कसे जगायचे हे मी तिला सांगत नाही. पण तिने याबाबत निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करावा असे मला वाटते. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुम्हाला लग्नच करावे लागेल असे नाही.

श्वेता पुढे म्हणाली – आयुष्यात लग्न होणे खूप महत्वाचे आहे आणि लग्नाशिवाय आयुष्य कसे जाईल, असे होऊ नये. मात्र, प्रत्येक लग्नाचा परिणाम वाईट नसतो असेही श्वेता म्हणाली. माझे अनेक मित्र आहेत जे सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत आणि मी त्यांच्यासाठी आनंदी आहे. पण मी माझ्या अनेक मित्रांना लग्नात तडजोड करताना पाहिले आहे, जे त्यांच्या आणि त्यांच्या मुलांसाठी चांगले नाही.

श्वेताचा पलकला खास सल्ला

मुलगी पलकला सल्ला देताना श्वेता तिवारी म्हणाली – मला माझ्या मुलीला सांगायचे आहे की, ज्यामध्ये आनंद मि‍ळेल तेच करा, परंतु समाजाच्या दबावाखाली काहीही करू नका.

श्वेताने मोडलेल्या लग्नाविषयी सांगितले

श्वेताचे दोन्ही लग्न होऊ शकले नाही. याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली – खरे सांगायचे तर मी माझे पहिले लग्न वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र, दुसऱ्या लग्नात मी माझा वेळ वाया घालवला नाही. मला माहित होते की, ते खराब झाले तर ते आणखी वाईट होणार आहे, मी कितीही वाचवण्याचा प्रयत्न केला तरी. माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातून लोकांचे मनोरंजन होऊ शकते. जेव्हा तुम्ही लोकांची काळजी घेणे थांबवता तेव्हा ते तुम्हाला प्रश्न विचारण्याचे धाडसही करत नाहीत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news