Shubman Gill : विशाखापट्टणम कसोटीच्या दुसऱ्या डावात इंजेक्शन घेऊन खेळलो : गिल

Shubman Gill
Shubman Gill

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था,  भारत आणि इंग्लंड यांच्यात विशाखापट्टणम येथे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्यात भारताने १०६ धावांनी मोठा विजय मिळवला. मागील मोठ्या कालावधीपासून धावांसाठी संघर्ष करत असलेल्या गिलला दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात काही खास करता आले नाही, पण दुसऱ्या डावात शतकी खेळी करून गिलने भारताला मजबूत स्थितीत पोहोचवले. विशाखापट्टणम कसोटीच्या दुसऱ्या डावात इंजेक्शन घेऊन खेळलो असल्याचा खुलासा गिलने केला आहे. (Shubman Gill)

Shubman Gill : इंजेक्शन घेऊन खेळलो

सामन्यानंतर झहीर खान आणि केविन पीटरसनशी चर्चा करताना गिलने सांगितले की, दुसऱ्या डावात फलंदाजीला येण्यापूर्वी बोटांना मार लागल्याने तो इंजेक्शन घेऊन खेळण्यासाठी आला होता, पण तरीही माझ्या वडिलांनी मला सांगितले की, तू एक मोठी खेळी मिस केली आहेस, यावर मी त्यांना म्हणालो, पापा, मी तुमच्याशी सहमत आहे. देवाचे आभार मानतो की त्याने आज मला आज हॉटेलमधून बाहेर येऊ दिले, असे गिलने मिश्किलपणे नमूद केले.
दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात गिलने ४६ चेंडूंत ३४ धावांची छोटी खेळी केली. पण, यशस्वी जैस्वालच्या द्विशतकामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. टीम इंडिया अडचणीत असताना शुभमनने १४७ चेंडूंत १०४ धावांची शतकी खेळी करून पुनरागमन केले. याशिवाय भारतीय संघातील आपली जागा मजबूत केली. कारण सततच्या फ्लॉप शोमुळे तो संघाबाहेर होण्याच्या स्थितीत होता.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news