Shriya Pilgaonkar : ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, श्रियावर भडकले नेटकरी

Shriya Pilgaonkar
Shriya Pilgaonkar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : थरारक मर्डर मिस्ट्री असणारे मर्डर इन अगोंडा (Murder In Agonda) ही सीरीज सध्या चर्चेत आहे. सरला ही भूमिका साकारणारी श्रिया पिळगावकरने या सीरीजमध्ये उत्तम अभिनय साकारला आहे. तिच्या भावाची भूमिका साकारणाऱ्या आसिफ खाननेदेखील उत्तम काम केलं आहे. छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या कुब्रा सैतनं देखील या सीरिजमध्ये चांगलं काम केलं आहे. श्रिया पिळगावकर ही दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची 'एकुलती एक' कन्या आहे. श्रियाने (Shriya Pilgaonkar) सुरुवातीला चित्रपटात काम केले पण, तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही. तिने वेबसीरीज देखील केल्या. आताही तिची मर्डर इन अगोंडा ही सीरीज चर्चेत आहे. दरम्यान श्रियाने बोल्ड फोटोशूट केल्यामुळे ती चर्चेत आली आहे. ती या फोटोशूटमध्ये सुंदर दिसत असली तरी काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. (Shriya Pilgaonkar)

श्रियाने आपले काही बोल्ड फोटोज इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. दोन फोटोजना तिने Sporty Spice ???अशी कॅप्शन लिहिलीय. तिने व्हाईट फ्लोरल फुल स्लिव्ह्ज मोनोकिनी घातली आहे. या आऊटफिटवर तिने कॅमेरासमोर पोज दिले आहेत. हे बोल्ड फोटो पाहून काही नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली. तर काहींनी तिच्या सौंदर्याचे कौतुकही केले. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही म्हणत नेटकऱ्यांनी तिला सुनावले.

काय आहे Murder in Agonda मध्ये?

Murder in Agonda या सीरिजमध्येदेखील गोवा दाखवण्यात आला आहे. या वेब सीरिजचं कथानक हे गोव्यात झालेल्या एका खुनावर आधारित आहे. माला नावाच्या एका माहिलेभोवती ही कथा फिरते. ही वेब सीरीज काल्पनिक दाखवण्यात आलीय. गोव्यातील एका बंगल्यात ख्रिसमस साजरा करण्यासाठी माला आपल्या फॅमिलीसोबत डिनरचं आयोजन करते. पण ख्रिसमसच्या रात्रीला मालाचा खून होतो आणि पोलीस अधिकाऱ्याला त्याची पहिली केस मिळते, अशी सीरीजची कहाणी दाखवण्यात आलीय. यामध्ये श्रिया पिळगावकरने उत्तम काम केलं आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news