Sanjay Dutt : केजीएफ २ नंतर संजय पुन्हा खलनायकाच्या भूमिकेत; घेतले इतके मानधन? | पुढारी

Sanjay Dutt : केजीएफ २ नंतर संजय पुन्हा खलनायकाच्या भूमिकेत; घेतले इतके मानधन?

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त ( Sanjay Dutt)ला केवळ हिरोच्या भूमिकेसाठी नव्हे तर जास्त करून खलनायकाच्या भूमिकेसाठी चांगलीच पसंती मिळते. यावर्षी रिलीज झालेल्या साऊथ अभिनेता यश याच्या ‘केजीएफ २’ या चित्रपटातील संजय दत्तच्या ‘अधीरा’ (खलनायक) च्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. याच दरम्यान सध्या संजय दत्ताला आणखी एका मोठ्या साऊथचा चित्रपटाची ऑफर मिळाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटातही संजय दत्तला खलनायकाची भूमिका साकारण्याची पुन्हा संधी मिळाली आहे. तर संजयने या चित्रपटासाठी मोठे मानधन घेतल्याचे बोलले जात आहे.

संजय दत्तला ( Sanjay Dutt ) नुकतेच साऊथचे दिग्दर्शक लोकेश कनगराज (Lokesh Kanagaraj) यांनी त्याला एका साऊथ चित्रपटाची ऑफर दिली आहे. या चित्रपटात संजय दत्त रंजक खलनायकांची भूमिका साकारणार आहे. ‘केजीएफ २’ चित्रपटानंतर आता संजय साऊथ स्टार विजय (Vijay) याच्यासोबत आगामी साऊथ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट गँगस्टर अॅक्शन थ्रिलरवर आधारित आहे. यात विजय गँगस्टरच्या भूमिकेत तर संजय खलनायकाची भूमिकेत दिसणार आहे. याच दरम्यान या चित्रपटासाठी संजय दत्तला मोठ्या मानधनाची ऑफर मिळाली असल्याचेही बोलले जात आहे.

BREAKING: Sanjay Dutt visits Lilavati for tests, future course of treatment being decided : Bollywood News - Bollywood Hungama

मिळालेल्या एका रिपोर्टच्या माहितीनुसार, चित्रपटाचे दिग्दर्शक लोकेश कनगराज यांना चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी तगडा स्टार हवा होता. यामुळे लोकेश कनगराज यांनी संजय दत्तशी फोनवरून संपर्क साधला. यानंतर या चित्रपटाच्या खलनायकाच्या भूमिकेसाठी त्याने होकार दिल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, अध्याप या चित्रपटाचे नाव निश्चित झालेले नाही. तसेच या चित्रपटासाठी संजय दत्त १० कोटी रूपये घेणार असल्याचे देखील बोलले जात आहे. या चित्रपटाचे शूटिंग यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू होणार आहे. यामुळे संजय दत्तला आणि विजयला एकत्रित पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Sanjay Dutt to wrap up Sadak 2 dubbing before medical break

‘केजीएफ २’ चित्रपटापूर्वी संजय दत्त अनेक चित्रपटांमध्ये खलनायकांच्या भूमिका साकारल्या आहेत. यात ‘पानिपत’, ‘शमशेरा’, ‘अग्निपथ’, ‘खलनायक’, ‘मुसाफिर’, ‘प्लान आणि वास्तव’ या चित्रपटांमध्ये संजयने खलनायकाच्या भूमिकेतून चाहत्याच्यात वेगळे स्थान निर्माण केले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button