India vs Bangladesh : बांगलादेशविरुद्ध श्रेयस अय्यर खेळल्यास कट्ट्यावर कोण बसणार?

India Vs Bangladesh :
India Vs Bangladesh :

पुढारी ऑनलाईन डेस्क : India vs Bangladesh : आशिया कपच्या सुपर चार फेरीत भारताचा शेवटचा सामना बांगलादेश विरुद्ध शुक्रवारी (दि. 15) खेळवण्यात येणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या गोटातून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेला टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सराव सत्रात संघासोबत दिसला आहे. हे चित्र पाहता त्याला बांगला देश विरुद्ध प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल अशी दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सुपर 4 फेरीतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी अय्यरला (Shreyas Iyer) पाठदुखीचा त्रास सुरू झाला होता. खुद्द बीसीसीआयने याबाबत ट्विटरवरून खुलासा केला होता. त्यामुळे अखेरच्या क्षणी केएल राहुलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. त्यानंतरही श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अय्यर संघासोबत स्टेडियममध्येही गेला नव्हता. तो संपूर्ण दिवस हॉटेलमध्येच राहिला. अशा परिस्थितीत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी सराव सत्रात सहभागी होणे ही भारतीय संघ आणि त्याच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे.

India vs Bangladesh : श्रेयस आल्यास राहुल-इशान कोण कट्ट्यावर बसणार?

पाठीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर अय्यरची (Shreyas Iyer) आशिया चषक (Asia Cup) साठी निवड करण्यात आली होती. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळाले, जिथे त्याने 14 धावांची छोटी खेळी लेली. यानंतर त्याला नेपाळविरुद्ध फलंदाजीची संधी मिळाली नाही, करण त्या सामन्यात भारताने 10 गडी राखून विजय मिळवलला होता. त्यानंतर टीम इंडिया (Team India) सुपर-4 मध्ये पोहचली. तिथे पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध होता पण त्या सामन्यापूर्वी अय्यरला बाहेर पडावे लागले. त्यामुळे अय्यरच्या जागी मांडीच्या दुखापतीतून सावरलेल्या केएल राहुलला (KL Rahul) खेळण्याची संधी मिळाली, ज्याने पाक विरुद्ध शानदार शतक झळकावले आणि विराट कोहलीसोबत (Virat kohli) तिसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारीही केली.

पाकिस्तानपाठोपाठ भारताने सुपर-4 मध्ये श्रीलंकेचा पराभव करून अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले आहे. सुपर-4 मध्ये टीम इंडियाचा शेवटचा औपचारिक सामना बांगलादेशविरुद्ध आहे. या सामन्यापूर्वी श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पूर्णपणे तंदुरुस्त आढळल्यास भारतीय संघ त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी देऊन त्याची चाचणी घेऊ शकतो. (India vs Bangladesh)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news