हिंगोली : औंढा नागनाथ नगरपंचायतीवर शिवसेनेची एकहाती सत्ता

हिंगोली www.pudhari.news.in
हिंगोली www.pudhari.news.in
Published on
Updated on

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ (जि-हिंगोली) येथील नगरपंचायतची गुरुवारी (दि-१७) विशेष सभा घेण्यात आली. या सभेत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांची निवड करण्यात आली. नगराध्यक्षपदासाठी केवळ एकच अर्ज आल्याने राजू उर्फ कपिल खंदारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपनगराध्यक्ष पदासाठीही एकच अर्ज आल्याने साहेबराव देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे पीठासीन अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांनी जाहीर केले.

नगरपंचायतीची दोन्ही पदे शिवसेनेकडे बिनविरोध आल्याने औंढा नगरपंचायतीवर शिवसेनेची एक हाती सत्ता आली आहे. नगरपंचायतीत शिवसेना ९ काँग्रेस ४ वंचित बहुजन आघाडी २ भाजपा २ असे संख्याबळ होते. यादरम्यान नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदासाठी घेण्यात आलेल्या निवडीची केवळ औपचारिकता पूर्ण करण्यात आली.

दरम्यान नुतन नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांचा आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम समाज कल्याण सभापती फकीरराव मुंडे, माजी सभापती अनिल देशमुख आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. पीठासीन अधिकारी म्हणून डॉ.सचिन खल्लाळ यांनी काम पाहिले. तर सहकार्य मुख्याधिकारी सचिन जयस्वाल विजय महामुने, अविनाश चव्हाण यांनी केले.

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news