वाशिम : मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने अपघातात २ ठार | पुढारी

वाशिम : मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने अपघातात २ ठार

वाशिम : पुढारी वृत्तसेवा : शिरपूर जैन येथिल शिरपूर रिसोड रोड वर एकाम्बा फाट्यावर भरधाव मोटारसायकल रस्त्याच्या वळणावर नियंत्रणात न आल्याने अपघात झाला. या अपघातात मोटार सायकल वरील संतोष लक्ष्मण जानोळकर वय ५० वर्ष व मोशिन शाह, हबीब शाह वय २६ वर्ष दोघे रा.शिरपूर जैन ठार झाले. ही घटना दिनांक १६ फेब्रुवारी रोजी रात्री ९:30 वाजण्याच्या सुमारास घडली. (Washim)

रिसोड कडून शिरपूर जैन कडे येत असतांना टी.व्ही.एस.अपाची मोटारसायकल क्रमांक एम.एच. १४ जे. व्ही. ४८०५ हि भरधाव वेगाने असल्याने शिरपूर गावा नजीक एकाम्बा फाट्यावर वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले. रस्त्याच्या बाजूला लावण्यात आलेल्या लोखंडी गार्डला जोरदार धडक दिल्याने मोशीन शाह याला जोरदार धडक लागल्याने जागेवरच मृत झाला. तर संतोष जानोळकर यांचा लोखंडी गार्डने गळा चिरला गेल्याने रक्तस्त्राव झाल्याने उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. शिरपूर जैन येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात शवविच्छेदनाची व्यवस्था नसल्याने प्रेत मालेगांव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. (Washim)

हेही वाचलतं का?

Back to top button