Shivjayanti 2024 : ५ किल्ल्यांवरील माती आणि पाण्याने साकारली शिवछत्रपतींची मूर्ती!

Shivjayanti 2024 : ५ किल्ल्यांवरील माती आणि पाण्याने साकारली शिवछत्रपतींची मूर्ती!

रयतेचे स्वतंत्र, सार्वभौम स्वराज्य निर्माण करणार्‍या शिवछत्रपतींचा जयंती (Shivjayanti 2024) सोहळा केवळ उत्सव म्हणून साजरा केला जात नाही, तर त्याला जोड असते विचारांची अन् कृतिशीलतेची. शिवछत्रपतींना डोक्यावर घेऊन न मिरवता त्यांचे विचार डोक्यात घेऊन वाटचाल करणे म्हणजे खर्‍याअर्थाने शिवजयंती साजरी करण्याचा विचार जनमनात रुजू लागला आहे. त्याची प्रचिती देणारे उपक्रम विविध संस्था, संघटना, तालीम मंडळे आणि व्यक्तींच्या वतीने राबविले जात आहेत.

संबंधित बातम्या : 

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : रयतेचे स्वतंत्र, सार्वभौम स्वराज्य निर्माण करणार्‍या शिवछत्रपतींचा जयंती (Shivjayanti 2024) सोहळा अनोख्या पद्धतीने साजरा करण्यावर प्रत्येकाचाच प्रयत्न असतो. यातूनच कलासक्त-शिक्षक व क्रीडा प्रशिक्षक सतीश वडणगेकर यांनी पाच किल्ल्यांवरील मातीतून शिवछत्रपतींची मूर्ती साकारली आहे. ही मूर्ती शाहूपुरी कुंभार गल्ली (7 वी गल्ली) येथे पाहायला मिळणार आहे.

वडणगेकर यांनी शिवछत्रपतींची मूर्ती साकारण्यासाठी त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणार्‍या पन्हाळगड, भुदरगड, अजिंक्यतारा, सज्जनगड व रायगड या पाच किल्ल्यांवरील माती व पाणी संकलित केले. यासाठी त्यांना ऋषीकेश मालोरे (रायगड), अशोक कुंभार (अजिंक्यतारा, सज्जनगड, सातारा), राजू कुंभार (पन्हाळगड) यांच्यासह अमोल आरेकर, सचिन पुरेकर, मनोज वडणगेकर, शरद पुनाळकर, दिनकर कुंभार यांचे सहकार्य मिळाले. (Shivjayanti 2024)

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news