पुढारी ऑनलाईन डेस्क : लाखो कार्यकर्त्यांनी पक्ष बनतो. विधिमंडळ पक्ष हा मर्यादीत काळासाठी असतो. त्यामुळे विधिमंडळ पक्ष हा मुळ पक्षावर दावा करू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयानेही हे आपल्या निर्णयात स्पष्ट केले आहे. तरीही केवळ याच आधारावर शिंदे गट आपला बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे. एकनाथ शिंदे हे गटनेते असले तरी निवडणूक आयोगासमोर त्या पदाची नोंदच होत नाही. कारण, पक्ष म्हणून कायद्यासमोर गटनेत्याचे अस्तित्वच नाही, असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केला. (ShivSena MLA Disqualification Case)
शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवरील अंतिम युक्तिवादाला आजपासून (दि.१८) सुरूवात झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोरील या युक्तिवादासाठी शिवसेना ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत आणि शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी बाजू मांडत आहेत. आजपासून पुढील तीन दिवस हा युक्तिवाद रंगणार आहे. सुरूवातीला ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. (ShivSena MLA Disqualification Case)
हेही वाचा :