Congress ‘Donate for Desh’ : काँग्रेसच्‍या ‘डोनेट फॉर देश’ देणगी अभियान मोहिमेला प्रारंभ

काँग्रेसच्‍या 'डोनेट फॉर देश'  मोहिमे शुभारंभ प्रसंगी बाेलताना पक्षाध्‍यक्ष मल्लिकार्जुन खर्गे.
काँग्रेसच्‍या 'डोनेट फॉर देश'  मोहिमे शुभारंभ प्रसंगी बाेलताना पक्षाध्‍यक्ष मल्लिकार्जुन खर्गे.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेसच्‍या 'डोनेट फॉर देश' (देशासाठी देणगी) मोहिमेला आज ( दि. १८) प्रारंभ झाला. पक्षाने देशातील जनतेकडून देणगी मागण्‍याची ही पहिलीच वेळ आहे. ( Congress 'Donate for Desh' )

'डोनेट फॉर देश' या मोहिमेच्‍या शुभारंभ प्रसंगी पक्षाध्‍यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, "देशासाठी जनतेकडून देणगी मागण्याची ही पहिलीच वेळ आहे. तुम्ही श्रीमंत लोकांवर अवलंबून राहून काम करत असाल तर तुम्हाला त्यांच्या धोरणांचे पालन करावे लागेल. महात्मा गांधींनीही स्वातंत्र्यलढ्यात जनतेकडून देणग्या घेतल्या होत्या."

Congress 'Donate for Desh': देशव्यापी देणगी अभियान

काँग्रेस पक्षाला १३८ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने 'डोनेट फॉर देश' हे देणगी अभियान कॉंग्रेसकडून सुरु करण्यात आला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी टिळक स्वराज कोष हे अभियान सुरु केले होते, त्यांच्या प्रेरणेतुन हे अभियान सुरु करण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात आज पक्षाअध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते झाली.

पक्षात आलेली मरगळ आणि निवडणुकीत झालेला पराभव झटकण्यासाठी 'डोनेट फॉर देश' हा उपक्रम आहे. शभरातील लोकांपर्यंत, नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आणि पक्षाचा जनसंपर्क वाढवणे हा यामागील उद्देश असल्याचे बोलले जात आहे.'डोनेट फॉर देश' या अभियानात सहभागी होऊन लोकांनी देणगी द्यावी, असे आवाहन पक्षाचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी केले होते. ( Congress 'Donate for Desh' )

प्रत्येक बूथमधील किमान १० घरांमधून किमान १३८ रुपये देणगीसाठी प्रयत्‍न

डिसेंबरपर्यंत हे अभियान ऑनलाईन असेल आणि त्यानंतर ऑफलाईन पद्धतीनेही सुरू करण्यात येणार आहे. देशाच्या प्रत्येक बूथमधील किमान १० घरांमधुन किमान १३८ रुपये देणगी मिळेल, यासाठी पक्ष पदाधिकारी प्रयत्न करतील. पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी १३८० दान करा, असे आवाहन केले आहे. जी लोक दान देऊ शकतात, असे देणगीदार शोधा असेही पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.

देणगीदात्याला मिळणार  काँग्रेस अध्यक्षांची स्वाक्षरी असलेले देणगी प्रमाणपत्र

या अभियानाबद्दल बोलताना काँग्रेस कोषाध्यक्ष अजय माकन म्हणाले होते की, "पक्षाला १३८ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त या अभियानाद्वारे देणगीदात्यांना देणगी देता येईल. भारताचा नागरिक असलेला आणि वयाची १८ वर्ष पूर्ण केलेला व्यक्ती या अभियानाद्वारे दान करु शकतो. यातील प्रत्येक देणगीदात्याला काँग्रेस अध्यक्षांची स्वाक्षरी असलेले देणगी प्रमाणपत्र मिळणार आहे."

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news