Shilpa Shetty : दुखापतीनंतर शिल्पाची भावूक पोस्ट; शारीरिक-मानसिक वेदना…(Video)

shilpa shetty
shilpa shetty

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी गुडघ्याच्या दुखापतीमुळे उपचार घेत आहे. ती गुडघ्यामुळे तिला चालता येणंही शक्य नव्हतं. मागील दोन महिन्यांपासून ती उपचार घेत आहे. आज तिने वर्ल्ड मेंटल हेल्थ डे च्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट (Shilpa Shetty) लिहिली आहे. जी कुणी वाचून कुणीही भावूक होईल. उपचारादरम्यान, तिने सोशल मीडियावर सुंदर सुंदर व्हिडिओज अपलोड केले होते. आता देखील तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. (Video) या व्हिडिओवर कॅप्शनमध्ये तिने भली मोठी पोस्ट लिहून आपले म्हणणे मांडले आहे. शिवाय, तिला कोणत्या दुखण्यातून जावे लागले आणि तीयामधून कशी सावरली, याबाबत तिने सांगितले आहे. (Video) तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा फिजीओथेरपी घेताना दिसते. शिवाय, तिची मुलगी समीशादेखील आपल्या आईची काळजी घेताना दिसतेय. (Shilpa Shetty)

शिल्पाने पोस्टमध्ये लिहिलंय-

"माझ्या दुखापतीला आज दोन महिने झाले आहेत. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते की हे सोपे नव्हते. मानसिक वेदना शारीरिक वेदनांइतकीच तीव्र आहे. माझ्यासारख्या वर्कहोलिक आणि फिटनेस व्यसनी असलेल्या व्यक्तीसाठी, या आठ आठवड्यांमध्ये निराशा, राग, दुःख आणि असहाय्य असल्यासारखे वाटले. पण, मला माझ्या मुलीकडून लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रेरणेचा एक अतिशय मजबूत स्रोत सापडला ♥️♥️प्रत्येक फिजिओथेरपीवेळी समिशा माझ्या जवळपास असते. जसजसा वेळ निघून गेला तसतसे मला जाणवले की ती मी "तिला पुन्हा कधी उचलून घेईन" याची आतुरतेने वाट पाहत होती??? तिचे हसू, मिठी, थोडा गोड पापा हेच ​​ दिवस मला हवे होते?

समीशा नेहमी आपल्या आईला विचारते की, आपण कसे आहात आता? यावर उत्तर देताना शिल्पा म्हणते-ती खूप मजबूत आहे. हे ऐकून तोतऱ्या आवाजात ती शिल्पाला म्हणते, आपण मग ठिक व्हा आधी आणि मला उचलून घ्या. इतकचं नाही तर समीशा या व्हिडिओमध्ये शिल्पाला 'आय लव्ह यू' म्हणताना दिसते.

ती पुढे लिहिते की -आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या तणावातून जात असतो. आपण स्वतःहून काही गोष्टींचा सामना करू शकत नसल्यास, मदत घ्या. यावर चर्चा करण्यासाठी मानसिक आरोग्य दिवसापेक्षा योग्य दिवस असू शकत नाही. तुटलेली ह्रदये आणि आत्मा तुटलेल्या हाडांपेक्षा कमी वेदनादायक नसतात. प्रत्येकजण त्या सर्वांपासून बरे होण्यास पात्र आहेत. ♥️?" याशिवाय तिने माझ्या डॉक्टरांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. तसेच तिने सर्व हितचिंतकांना प्रार्थना आणि शुभेच्छा ♥️? दिल्या आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news