

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: झणझणीत, लज्जतदार, चमचमीत, अस्सल कोल्हापुरी पदार्थांचा आस्वाद घेत मनसोक्त शॉपिंग करण्याची संधी शहरवासीयांना 'पुढारी' आयोजित व चकोते ग्रुप प्रस्तुत शॉपिंग अॅण्ड फूड फेस्टीव्हलच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. या शॉपिंग अॅण्ड फूड फेस्टीव्हलचे आयोजन दिनांक 13 ते 17 ऑक्टोबर दरम्यान चिंचवड येथील राजर्षी शाहू महाराज मैदान (बहिरवाडे मैदान) येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटी हे सहप्रायोजक असून, स्मिता हॉलिडेज हे ट्रॅव्हल पार्टनर आहेत. शहरवासीयांना एकाच छताखाली 5 दिवस दिवाळी खरेदी करता येईल; तसेच ओरिजिनल कोल्हापुरी खाद्यपदार्थांचा आस्वादही खवय्यांना घेता येईल आणि याबरोबरच दररोज धम्माल मनोरंजन कार्यक्रमही होणार आहेत.
एकाच ठिकाणी आपल्या विविध प्रॉडक्ट विक्रीसाठीचीही सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रदर्शनामध्ये : इलेक्ट्रॉनिक उत्पादने, फर्निचर, गृहोपयोगी वस्तू, कपडे, ज्वेलरी, कॉस्मेटिक्स खरेदीचे स्टॉल्स्; तसेच खवय्यांसाठी मसाले, लोणची, चटण्या असे स्टॉल्स उपलब्ध असतील. खाद्यपदार्थांची मेजवानी फेस्टिवलमध्ये खवय्यांसाठी कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, चिकन 65, फिशफ्राय, साऊथ इंडियन, पंजाबी, चायनीज, चौपाटी पदार्थ, पिझ्झा, बर्गर, सँडविच, फ्रुट्स ज्यूस, आईस्क्रीम अशा अनेक पदार्थांचा आस्वादही या ठिकाणी येणार्या नागरिकांना घेता येईल. खरेदीसाठी आणि खाद्यप्रेमींसाठी हे फेस्टिवल पर्वणी ठरणार आहे. गृहोपयोगी वस्तू आणि खाद्यपदार्थांसाठी स्वतंत्र दालनाची व्यवस्था या प्रदर्शनात करण्यात आली आहे.
दिवाळीची सर्व खरेदी, कोल्हापुरी तांबडा-पांढरा, कोल्हापुरी मिसळ, चिकन 65, फिश, खर्डाभाकरी, कोल्हापुरी वांगभाकरी, साऊथ इंडियन, पंजाबी, चायनीज, चौपाटी पदार्थ, पिझ्झा, बर्गर, सँडविच, फ्रुट्स ज्यूस, आईस्क्रीमसारखे अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स…
दि. 13 ते 17 ऑक्टोबर 2022
सकाळी 10 ते रात्री 9
राजश्री शाहूमहाराज ग्राउंड, महाबली मंदिररोड, साईनिकेतन हौसिंग सोसायटी, शाहुनगर, चिंचवड, पिंपरी-चिंचवड.
त्वरा करा! हजारो व्यक्तींपर्यंत पोहोचणारे एकमेव प्रदर्शनात आजच आपला स्टॉल बुक करा…
बाळासाहेब – 9850556009
रुपेश – 8888529500