हायप्रोफाइल शीना बोरा हत्याकांड: इंद्राणी मुखर्जी म्हणतेय ‘ती जिवंत आहे’

हायप्रोफाइल शीना बोरा हत्याकांड: इंद्राणी मुखर्जी म्हणतेय ‘ती जिवंत आहे’

मुंबई, पुढारी ऑनलाईन : देशात खळबळ उडवून देणाऱ्या शिना बोरा हत्याकांड  प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने सीबीआयला पत्र लिहून शीना जिवंत असल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात  तिने याचिकाही दाखल केली आहे. तिच्या या पत्रातील दाव्यानुसार शीना बाेरा काश्‍मीरमध्‍ये असून तिचा शोध घ्यावा, अशी मागणी तिने केली आहे, असे वृत्त इंडिया टुडे वेबसाईटने दिले आहे.  तिच्या या पत्रामुळे या हत्याकांड प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची चिन्हे आहेत.

२०१५ मध्ये शीना बोरा हत्या प्रकरणात इंद्राणी मुखर्जीला अटक केल्यानंतर ती भायखळा जेलमध्ये आहे. हायप्रोफाइल शीना बोरा हत्याकांड प्रकरणाने एकच खळबळ उडवून दिली होती. कोर्पोरेट वर्तुळातील इंद्राणी मुखर्जी हिच्यासह तिचा दुसरा पतीही या प्रकरणात अडकला होता.

शीना बोरा ही इंद्राणी मुखर्जीची मुलगी होती. ती इंद्राणीच्या आईकडे राहत होती. तिचा भाऊ मिखेल हाही तिच्यासोबत राहत होता. दरम्यान एका मासिकात इंद्राणीचा फोटो छापून आल्यानंतर तिने आपण पीटर मुखर्जीसोबत लग्न केल्याचे सांगितले. त्यानंतर शीना मुंबईत आली. त्यांनतर अनेक पार्ट्यांमध्ये ती दिसू लागली. त्यावेळी इंद्राणी ही शीनाची ओळख आपली बहीण अशी करून देत होती.

२०१२ मध्ये ती अचानक गायब झाली. त्यानंतर पीटर मुखर्जीचा मुलगा राहुल याने तिला शोधण्याचा प्रयत्न केला. शीना आणि राहुल यांच्यात प्रेम झाले होते. मात्र, शीना गायब झाल्याने तो सैरभैर झाला. काही दिवसांनी शीना परदेशात गेल्याचे सांगण्यात आले. अखेर इंद्राणीच्या ड्रायव्हरला पोलिसांनी अटक केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला हाेता. इंद्राणीने वांद्र्यात शीनाची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट रायगड तालुक्यात लावली. पोलिसांनी इंद्राणीसोबत तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना यालाही या प्रकरणात अटक केली. या कटात सहभागी असल्याने पीटर मुखर्जीलाही अटक केली होती. २०२० मध्ये त्याला जामीन देण्यात आला. दरम्यान खटला सुरू असताना या दोघांनी घटस्फोट घेतला.

दरम्यान, भायखळ्यात जेलची हवा खात असलेल्या इंद्राणीने आपल्या याचिकेत आणि पत्रात म्हटले आहे की, आपल्याला काही दिवसांपूर्वी एक महिला भेटण्यासाठी आली होती. तिने आपल्याला सांगितले की, शीना काश्मिरमध्ये असून पोलिसांनी तिचा शोध घ्यावा.

ड्रायव्हरमुळे झाला हाेता उलगडा

इंद्राणी मुखर्जीचा चालक श्यामवर राय याला पोलिसांनी अटक केली. त्यावेळी त्याच्याकडे पिस्तूल होते. त्यानंतर हे हत्याकांड उघडकीस आले. इंद्राणी मुखर्जीने २०१२ मध्ये गळा दाबून शीना बोराची हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले हाेते. या प्रकरणात ताे माफीचा साक्षीदार झाला हाेता.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news