omicron : बुलडाण्यात आढळला ओमायक्राॅनचा रूग्ण | पुढारी

omicron : बुलडाण्यात आढळला ओमायक्राॅनचा रूग्ण

बुलडाणा, पुढारी वृत्तसेवा : दुबईवरून बुलडाणा येथे परतलेली ती ५५ वर्षीय व्यक्ती ही प्रयोगशाळेतील स्वॅब  तपासणीत ओमायक्रॉन (omicron) पॉझिटीव्ह आढळून आली आहे.
या बाधित पुरूष रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्या रुग्णात कुठलीही लक्षणे दिसत नाहीत. परंतु, १४ दिवस निरीक्षणात ठेवण्यात येईल. संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील सर्व ९ व्यक्ती कोरोना निगेटीव्ह आढळल्या आहेत.
९ डिसेंबर रोजी दुबईवरून आलेली ही व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळली होती. त्यानंतर त्याचे स्वॅबचा नमुना पुणे येथे ओमायक्रॉन चाचणीसाठी पाठविण्यात आला होता. ४ दिवसानंतर हा रिपोर्ट प्राप्त झाला असून तो ओमायक्राॅन ‘पॉझिटीव्ह’ आहे.
तथापि बुलडाणा शहरवासियांनी घाबरू नये ओमायक्रॉन बाधित ही व्यक्ती ठणठणीत असून १४ दिवसांच्या प्रोटोकॉलनंतर त्यास सुटी देण्यात येणार आहे. ओमायक्रॉनचा हा बुलडाणा जिल्ह्यातील पहिला रूग्ण आहे.

Back to top button