Anju’s Father Statement : पाकिस्‍तानमध्‍ये जावून निकाह केलेल्‍या भारतीय अंजूचे वडील म्‍हणाले, ‘ज्‍या क्षणी तिने …’

Anju’s Father Statement : पाकिस्‍तानमध्‍ये जावून निकाह केलेल्‍या भारतीय अंजूचे वडील म्‍हणाले, ‘ज्‍या क्षणी तिने …’

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्तानमध्ये गेलेल्या राजस्‍थानमधील महिला अंजू हिने धर्मांतर करून निकाह केला आहे. देशभरात हा विषय चर्चेचा ठरला आहे. आपण पाकिस्‍तानमध्‍ये मित्राला भेटण्यासाठी गेले असून २० ऑगस्टला भारतात परतणार असल्‍याचे तिने सांगितले होते. मात्र तिने इस्लाम धर्म स्वीकारून पाकिस्‍तानमधील तरुण नसरुल्लाहशी लग्न केल्याचे वृत्त समोर आले. (Anju's Father Statement ) यावर अंजूच्‍या वडिलांनी तीव्र संताप व्‍यक्‍त केले आहे.

Anju's Father Statement : तिने जे केले ते खूप लाजिरवाणं…

माध्‍यमाशी बोलताना अंजूचे वडील गया प्रसाद म्‍हणाले की, अंजूशी आमचे कोणतेही संबंध नाहीत. ज्या क्षणी तिने भारत सोडला, त्याच क्षणी आम्ही तिच्याशी सर्व संबंध तोडले आहेत. तिने जे केलं ते खूप लाजिरवाणं आहे माझी मुलगी असे करू शकते याची मी कल्पनाही केली नव्हती.

Anju's Father Statement : दोन मुलांना सोडणार्‍या मुलीशी नाते कसे असू शकते?

अंजूने पाकिस्तानी प्रियकर नसरुल्लाशी लग्न करण्यापूर्वी इस्लाम स्वीकारला. तिच्या धर्मांतरानंतर, ती आता फातिमा नावाने जाते. ती कोठे आहे याची आम्‍हाला माहिती नाही. तिच्याशी आमचा काहीही संबंध नाही. गेल्या एक वर्षापासून मी तिच्याशी बोललो नाही. ज्या स्त्रीने फक्त आपल्या पतीलाच नाही तर आपल्या दोन मुलांना देखील सोडले तिच्याशी माझे नाते कसे असू शकते?" असा सवालही त्‍यांनी केला.

ऑनलाईन प्रेमासाठी अंजूने ओलांडली होती सीमा

मागील काही दिवस पाकिस्‍तानी नागरिक सीमा हैदरची लव्‍हस्‍टोरी देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. माझ्‍या प्रेमासाठी नेपाळमार्गे भारतात आल्‍याचा दावा ती करत आहे. आता सीमा हैदर प्रमाणेच एक भारतीय विवाहित महिला आपल्‍या फेसबूक फ्रेंडला भेटण्‍यासाठी 'सीमा' ओलांडत पाकिस्‍तानमध्‍ये गेल्‍याचे उघड झाल्‍याचे वृत्त पाकिस्‍तानमधील असे 'एआरवाय न्यूज'ने दिले होते.

राजस्‍थानमधील भिवडी जिल्‍ह्यातील अंजू आपली पती अरविंद आणि त्याची पत्नी अंजू आणि मुलांसह भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता.अंजू एका खाजगी कंपनीत बायोडेटा एंट्री ऑपरेटर म्हणून नोकरी करत होती. तिला १५ वर्षांची एक मुलगी आणि ६ वर्षांचा मुलगा आहे. तिची पाकिस्‍तानच्‍या वायव्‍य खैबर पख्‍तुनख्‍वा प्रांतातील तरुण नसरुल्ला याच्‍याशी फेसबुकवर मैत्री झाली. काही दिवसांमध्‍ये या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. तिने पती अरविंदला जयपूरमध्‍ये नातेवाईकांकडे जात असल्‍याचे सांगितले. मात्र रविवारी अंजू सीमेपलीकडे खैबर पख्‍तुनख्‍वा गेल्याची माहिती पाकिस्‍तानमधील माध्‍यमांनी दिल्‍यानंतर ही घटना उघडकीस आली होती.

पाकिस्‍तानमध्‍ये इस्‍लाम धर्म स्‍वीकारुन प्रियकराबरोबर केला निकाह

पाकिस्तानच्या मलाकंद विभागाचे उपमहानिरीक्षक नासिर मेहमूद सत्ती यांनी अंजू (३५) आणि नसरुल्लाह (२९) यांच्या निकाह झाल्‍याच्‍या वृत्ताला दुजोरा दिला आहे. महिलेने इस्लाम स्वीकारल्यानंतर तिचे नाव आता फातिमाचे झाले आहे. खैबर पख्‍तुनख्‍वा येथील नसरुल्लाहचे कुटुंबीय, पोलीस कर्मचारी आणि वकील यांच्या उपस्थितीत हे जोडपे दीर बाला येथील जिल्हा न्यायालयात हजर झाले. सुरक्षेच्या कारणास्तव, महिलेला पोलिस सुरक्षेत कोर्टातून तिच्या नवीन सासरच्या घरी नेण्यात आले.

प्रवासी कागदपत्रे तडताळीनंतर अंजूची सुटका

अंजू लोहारमध्‍ये पोहचली. पोलिसांनी तिला ताब्‍यात घेतले. तिला पोलीस कोठडी सुनावण्‍यात आली. मात्र प्रवासी कागदपत्रे पडताळल्यानंतर तिची सुटका करण्यात आली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी तिला सुरक्षा प्रदान करण्यात आल्‍याचेही या वृत्तात म्‍हटलं आहे. या प्रकरणी पाकिस्‍तानच्‍या पोलिसांनी माध्‍यमांना सांगितले की, "अंजू एका महिन्याच्या व्‍हिजावर पाकिस्तान आली आहे. ती नसरुल्‍लाशी लग्‍न करणार नाही. ती केवळ त्‍याला भेटण्‍यासाठी आली आहे. सध्या ती नसरुल्लाच्या घरी राहते."

मी सीमा हैदरसारखी नाही : अंजूने केला होता दावा

मागील काही दिवस पाकिस्‍तानी नागरिक सीमा हैदरची लव्‍हस्‍टोरी देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. माझ्‍या प्रेमासाठी नेपाळमार्गे भारतात आल्‍याचा दावा ती करत आहे. आता सीमा हैदर प्रमाणेच राजस्‍थानमधील विवाहित महिला अंजूने आपल्‍या फेसबूक फ्रेंडला भेटण्‍यासाठी 'सीमा' ओलांडत पाकिस्‍तानमध्‍ये गेल्‍याचे उघड झाल्‍याचे वृत्त पाकिस्‍तानमधील असे 'एआरवाय न्यूज'ने दिले आहे. मात्र या वृत्तावर अंजूने नाराजी व्‍यक्‍त केली होती.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news