Anju in Pakistan : पाकिस्तानमध्ये गेलेली अंजू धर्मांतर करून विवाहबद्ध | पुढारी

Anju in Pakistan : पाकिस्तानमध्ये गेलेली अंजू धर्मांतर करून विवाहबद्ध

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : Anju in Pakistan : पाकिस्तानमध्ये गेलेल्या अंजूने धर्मांतर करून नंतर विवाह केला. याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. सीमा हैदर प्रमाणेच एक भारतीय विवाहित महिला अंजू हीने आपल्‍या फेसबूक फ्रेंडला भेटण्‍यासाठी ‘सीमा’ ओलांडत पाकिस्‍तानमध्‍ये गेल्‍याचे उघड झाल्‍याचे वृत्त पाकिस्‍तानमधील असे ‘एआरवाय न्यूज’ने दिली. त्यानंतर संपूर्ण भारतात या अंजूची चर्चा होत आहे. तीने ती फक्त मित्राला भेटण्यासाठी आली आहे आणि 20 ऑगस्टला भारतात परतणार असे सांगितले होते. मात्र, आता अंजूने इस्लाम धर्म स्वीकारून नसरुल्लाहशी लग्न केल्याचे वृत्त आले आहे. त्यामुळे अंजू-नसरुल्लाहच्या भेटीने आता वेगळेवळण घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

विशेष म्हणजे अंजूच्या लग्नाने सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण एक दिवसापूर्वीच अंजू आणि नसरुल्लाह दोघांनीही त्यांच्यात प्रेमसंबंध नाही, असे म्हटले होते. अंजूने मी सीमा हैदरप्रमाणे नाही फक्त मित्राला भेटण्यासाठी आली आहे, असे म्हटले होते. तर नसरुल्लानेही PTI ला आमच्यात कोणतेही प्रेमसंबंध नाही, असे सांगितले होते. मात्र, दोघांच्या लग्नाच्या वृत्ताने या घटनेला नाट्यमय रित्या वेगळ्याच वळणावर नेऊन ठेवले आहे.

धर्मांतरणानंतर अंजू बनली फातिमा

अंजूने पाकिस्तानात धर्मांतरण केले आहे. तसेच धर्मांतरनानंतर तिचे नाव फातिमा ठेवण्यात आले आहे. त्यानंतर अप्पर दीर येथील जिल्हा न्यायालयात निकाह समारंभ झाला आहे. सध्या सोशल मीडियावर दोघांचा निसर्गरम्य डोंगराळ प्रदेशात फिरतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अंजू उर्फ फातिमाचा निकाह नसरुल्लाह याच्यासोबत झाल्याच्या वृत्ताची पुष्टी मलाकंद विभागाचे उपमहानिरीक्षक नसीर मेहमूद सत्ती यांनी केली आहे. तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नसरुल्लाहचे कुटुंबीय पोलीस कर्मचारी आणि वकील यांच्या उपस्थितीत हे जोडपे दीर बाला येथील जिल्हा न्यायालयात हजर झाले होते. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव या महिलेला पोलिस बंदोबस्तात कोर्टातून तिच्या नवीन सासरच्या घरी नेण्यात आले, अशी माहिती इंडिया टुडे ने दिली आहे.

Anju in Pakistan : नेमकं काय घडलं?

राजस्‍थानमधील भिवडी जिल्‍ह्यातील अरविंद त्याची पत्नी अंजू आणि मुलांसह भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता.अंजू एका खाजगी कंपनीत बायोडेटा एंट्री ऑपरेटर म्हणून नोकरी करत होती. अंजूची पाकिस्‍तानच्‍या वायव्‍य खैबर पख्‍तुनख्‍वा प्रांतातील तरुण नसरुल्ला याच्‍याशी फेसबुकवर मैत्री झाली. काही दिवसांमध्‍ये या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. तिने पती अरविंदला जयपूरमध्‍ये नातेवाईकांकडे जात असल्‍याचे सांगितले. मात्र रविवारी अंजू सीमेपलीकडे गेल्याची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे मिळाल्‍यानंतर अरविंदला धक्‍काच बसला.

Anju in Pakistan : अंजू खैबर पख्‍तुनख्‍वामध्‍ये

अरविंदने सांगितले की, अंजूने त्‍याच्‍याशी व्हॉट्स अॅपच्‍या माध्‍यमातून संपर्क ठेवला होता. रविवारी तिने दुपारी चार वाजता फोन केला होता. यावेळी तिने आपण लाहोरमध्‍ये असल्‍याचे सांगितले. तसेच दोन-तीन दिवसांत परत येणार असल्‍याचीही माहिती दिली. अंजूने परदेशात नोकरीसाठी २०२० मध्‍ये पासपोर्ट बनवला होता. गुरुवारी अंजू जयपूरला जाण्याच्या बहाण्याने तिच्या भिवडी येथील घरातून निघून गेली. त्यानंतर वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित नसरुल्ला याला भेटण्यासाठी खैबर पख्‍तुनख्‍वा येथे गेल्‍याचे वृत्त पाकिस्‍तानमधील ‘एआरवाय’ न्यूजने दिले आहे.

Anju in Pakistan : प्रवासी कागदपत्रे तडताळीनंतर अंजूची सुटका

अंजू लोहारमध्‍ये पोहचली. पोलिसांनी तिला ताब्‍यात घेतले. तिला पोलीस कोठडी सुनावण्‍यात आली. मात्र प्रवासी कागदपत्रे पडताळल्यानंतर तिची सुटका करण्यात आली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी तिला सुरक्षा प्रदान करण्यात आल्‍याचेही या वृत्तात म्‍हटलं आहे. या प्रकरणी पाकिस्‍तानच्‍या पोलिसांनी माध्‍यमांना सांगितले की, “अंजू एका महिन्याच्या व्‍हिजावर पाकिस्तान आली आहे. ती नसरुल्‍लाशी लग्‍न करणार नाही. ती केवळ त्‍याला भेटण्‍यासाठी आली आहे. सध्या ती नसरुल्लाच्या घरी राहते.”

Anju in Pakistan : मी सीमा हैदरसारखी नाही : अंजूने केला होता दावा

मागील काही दिवस पाकिस्‍तानी नागरिक सीमा हैदरची लव्‍हस्‍टोरी देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. माझ्‍या प्रेमासाठी नेपाळमार्गे भारतात आल्‍याचा दावा ती करत आहे. आता सीमा हैदर प्रमाणेच राजस्‍थानमधील विवाहित महिला अंजूने आपल्‍या फेसबूक फ्रेंडला भेटण्‍यासाठी ‘सीमा’ ओलांडत पाकिस्‍तानमध्‍ये गेल्‍याचे उघड झाल्‍याचे वृत्त पाकिस्‍तानमधील असे ‘एआरवाय न्यूज’ने दिले आहे. मात्र या वृत्तावर अंजूने नाराजी व्‍यक्‍त केली आहे. आपण सीमा हैदर नाही. मी कायदेशीररित्‍या पाकिस्‍तानला गेले आहे. लवकरच भारतात परतणार आहे, असे ‘इंडिया टूडे’ला दिलेल्‍या मुलाखतीमध्‍ये तिने स्‍पष्‍ट केले होते.

हे ही वाचा :

मी सीमा हैदरसारखी नाही, लवकरच भारतात परतणार : पाकिस्‍तानला गेलेल्‍या अंजूची स्‍पष्‍टोक्‍ती

गूढ कायम..! सीमा हैदरची तब्‍बल १८ तास चौकशी, आत होणार ‘ही’ टेस्‍ट

Back to top button