Share Market Opening | बँकिंग क्षेत्रातील संकटाचे शेअर बाजारात पडसाद, सेन्सेक्स ३५० अंकांनी कोसळला

Share Market Opening | बँकिंग क्षेत्रातील संकटाचे शेअर बाजारात पडसाद, सेन्सेक्स ३५० अंकांनी कोसळला

Share Market Opening : अमेरिकेतील दोन बँका बुडाल्यानंतर आता युरोपमधील सर्वात मोठी बँक क्रेडिट सुइस (Credit Suisse) आर्थिक संकटात सापडली आहे. बँकिंग क्षेत्रातील या संकटाचे पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत. या जागतिक कमकुवत संकेतांमुळे गुंतवणूकदार चिंतेत आहे. दरम्यान, आज गुरुवारी (दि.१६) सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स सुमारे ३५० अंकांनी कोसळून ५७,२०० पर्यंत खाली आला. तर निफ्टी १६,८५० वर आला. १३ पैकी आठ प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांना फटका बसला आहे. फायनान्सियल स्टॉक्स ०.२ टक्के आणि आयटी शेअर्स ०.६ टक्क्यांनी घसरले. मेटल निर्देशांक सुमारे २ टक्क्यांने घसरला.

बाजारातील स्थिती कमकुवत असतानाही FMCG स्टॉक्समध्ये आज तेजी दिसून आली. हे स्टॉक्स ८ टक्क्यांपर्यंत वाढले. यात नेस्ले इंडिया, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, हिंदुस्तान युनिलिव्हर, टाटा कंन्झूमर प्रोडक्ट्स यांचा समावेश होता. एशियन पेंट्स, टायटन, पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक, आयटीसी, सन फार्मा, एलटी, ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स यांनी तेजीत सुरुवात केली आहे. तर रिलायन्स, बजाज फिनसर्व्ह, मारुती, कोटक महिंद्रा हे शेअर लाल चिन्हात व्यवहार करत आहेत. (Share Market Opening)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news