Stock Market Closing | सेन्सेक्स ५८ हजारांखाली, सलग पाचव्या सत्रांतील घसरणीमु‍ळ‍े गुंतवणूकदारांना ८.५ लाख कोटींचा फटका

Stock Market Closing | सेन्सेक्स ५८ हजारांखाली, सलग पाचव्या सत्रांतील घसरणीमु‍ळ‍े गुंतवणूकदारांना ८.५ लाख कोटींचा फटका
Published on
Updated on

जागतिक संकेत सकारात्मक आहेत. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज बुधवारी (दि.१५) शेअर बाजारात तेजी परतली होती. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी वाढून ५८,४५० वर गेला. तर निफ्टी १५४ अंकांच्या वाढीसह १७,१९७ वर होता. त्यानंतर दुपारच्या सत्रात सेन्सेक्सने तेजी गमावली आणि त्याने स्थिर पातळीवर व्यवहार केला. आज सेन्सेक्स ३४४ अंकांनी घसरून ५७,५५५ वर बंद झाला. तर निफ्टी ७१ अंकांच्या घसरणीसह १६,९७२ वर स्थिरावला. सेन्सेक्स सलग पाचव्या सत्रात घसरला आहे. सलग पाच सत्रांतील घसरणीमुळे गुंतवणूकदारांना सुमारे ८.५ लाख कोटींचा फटका बसला आहे. बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल १५ मार्च रोजी २५५.७६ लाख कोटींवर आले. ९ मार्च रोजी हे बाजार भांडवल २६४.३० लाख कोटी होते. आज मेटल शेअर्समध्ये तेजी राहिली. तर फार्मा आणि ऑटो शेअर्समध्येही खरेदी दिसून आली. रिअल्टी, NBFCs मध्येही तेजी होती. एफएमसीजी आणि अदानींच्या काही शेअर्संवर दबाव राहिला.

आजच्या व्यवहारात मारुती (०.१७ टक्के वाढ), टायटन (१.६३ टक्के वाढ), एशियन पेंट्स (३ टक्के वाढ), कोटक महिंद्रा (१.३९ टक्के वाढ), पॉवर ग्रिड (१.२७ टक्के वाढ), अल्ट्राटेक सिमेंट (१.१० टक्के वाढ) हे शेअर्स वाढले. दरम्यान, दुपारच्या सत्रात भारती एअरटेल (-१.२० टक्के), सन फार्मा (-०.३३ टक्के), विप्रो (-०.६१ टक्के), टेक महिंद्रा (-०.०४ टक्के), एचसीएल टेक (-०.५० टक्के) हे शेअर्स खाली आले होते. सुरुवातीच्या व्यवहारात क्षेत्रीय निर्देशांकात निफ्टी मेटल १.६३ टक्क्यांनी वाढला. निफ्टी PSU Bank १.१३ टक्के वाढला. तर फायनान्सियल, ऑटो, एफएमसीजी, आयटी, मीडिया आणि फार्मा हेदेखील सुरुवातीच्या व्यवहारात वाढले होते.

अदानींच्या 'या' ३ शेअर्सना सलग दुसऱ्या सत्रात लोअर सर्किट्स

अदानी समूहाच्या काही शेअर्समध्ये घसरण कायम आहे. अदानी टोटल गॅस हा शेअर ५ टक्क्यांनी घसरून ९००.४५ रुपयांपर्यंत खाली आला. याआधीच्या सत्रात तो ९४७.८० रुपयांवर जाऊन बंद झाला होता. गेल्या काही दिवसांत हा शेअर ७४ टक्क्यांनी खाली आला आहे. अदानी ट्रान्समिशन हा शेअरदेखील ५ टक्क्यांच्या लोअर सर्किटमध्ये अडकला आहे. हा शेअर सध्या ८५६.५० रुपयांपर्यंत खाली आला आहे. गेल्या काही दिवसांत हा शेअर ६६ टक्क्यांनी गडगडला आहे. पण अदानी पॉवर या शेअरने २ टक्क्यांहून अधिक वाढून २०९.७५ रुपयांवर व्यवहार केला.

जागतिक बाजारातील स्थिती काय?

बुधवारी आशियाई शेअर्समध्ये वाढ झाली. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह कमी प्रमाणात व्याजदरवाढ करेल अशी गुंतवणूकदारांना आशा आहे. तसेच महागाईची तीव्रता काही प्रमाणात कमी झाल्याने अमेरिकेतील शेअर बाजारात सकारात्मक वातावरण आहे. परिणामी प्रमुख निर्देशांक हिरव्या चिन्ह्यात बंद झाले. एस अँड पी ५०० निर्देशांक १.७ टक्क्यांनी वाढला. तर डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज १.१ टक्क्यांने आणि नॅस्डॅक कंपोझिट २.१ टक्के वाढून बंद झाला. आशियाई बाजारातही तेजीचे वातावरण आहे. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक १४८ अंकांनी वाढून २७,३७१ वर खुला झाला आहे. टॉपिक्स निर्देशांकही वधारला होता. (Stock Market Closing)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news