Share Market Crash : शेअर बाजार गडगडला; सेंसेक्स, निफ्टीमध्ये मोठी घसरण

Share Market Crash : शेअर बाजार गडगडला; सेंसेक्स, निफ्टीमध्ये मोठी घसरण
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मागील आठवड्यापासून शेअर बाजारात ( Share Market Crash ) सुरु असलेली घसरण सोमवारी सुद्धा राहिली. दुपारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा सेंसेक्स १३०० अंकानी गडगडल्याचे पाहायला मिळाले. संध्याकाळी सेंसेक्स १५४५ (sensex) अंकांनी घसरुन ५७ हजार ४९१ अंकांव बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारात ४६८ अंकाची घसरण होऊन १७ हजार १४९ अंकावर बंद झाला. तर निफ्टीमध्ये (nifty) ४०५ अंकांची घसरण पहायला मिळाली. अखेर निफ्टीमध्ये १५१ अंकाची रिकव्हरी करुन १७१४९ अंकावर बंद झाला. आज सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये अडीच टक्क्यांपेक्षा अधिकची घसरण पहायला मिळाली.

दोन्ही बाजार सेंसेक्स अन निफ्टी गडगडल्याने त्याचा परिणाम कंपन्यांवर दिसून आला. विप्रो, बजाज फिनसर्व, इन्फोसेस, नायका, झोमॅटो, तसेच पेटीएम सारख्या कंपन्यांच्या शेअर्सना मोठा फटका बसल्याचे पहायला मिळाले. ( Share Market Crash )

मुंबई शेअर बाजारात ( Share Market Crash ) आज बजाज फायनान्सच्या शेअर्सला सर्वाधिक ६.३१ टक्क्यांची घसरण पहायला मिळाली. टाटा स्टील, टेक महिंद्रा यांच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांची घसरण तर बजाज फिनसर्व, टाइटम, विप्रोच्या शेअर मध्ये ४ टक्क्यांची घसरण झाली. रियालिटी शेअर्समध्ये ५.९३ टक्यांची घसरण तर मेटलमध्ये ४.६५ टक्क्यांची घसरण झाली. प्रामुख्याने रियल्टी, मेटल, मीडिया, आयटी आणि ऑटो या क्षेत्रातील कंपन्या शेअर्समध्ये अधिक घसरण झालेली आढळले.

जागतिक बाजाराचे निरीक्षण केले तर आशियामधील हाँगकाँग बाजारामध्ये सुद्धा घसरण पहायला मिळाली पण, शांघाई बाजार तेजीत असल्याचे पाहण्यास मिळाले. या सर्वात आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईल 0.92 टक्कांची वाढ घेत 88.70 डॉलर प्रतिबॅरल प्रयत्न पोहचला. शेअर बाजारातील घसरण आणि आकड्यांच्या अनिश्चिततेमुळे विदेशी कंपन्यांनी ३१४८.५० कोटींचे शेअरर्स विकले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news