Sharad Pawar : राज्यपालांची निवड किती चुकीची होती, हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले – शरद पवार

Sharad Pawar : राज्यपालांची निवड किती चुकीची होती, हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले – शरद पवार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यपालांची निवड किती चुकीच्या पद्धतीने केली जाते, याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांचे नाव महाराष्ट्रातील लोकांच्या लक्षात राहील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गुरुवारी व्यक्त केली. राज्यपालांची नियुक्ती आणि त्यांची सत्ताधार्‍यांना असलेली साथ याबद्दलही त्यांनी भूमिका मांडली.

ते म्हणाले, राज्यपाल (maharashtra ex governor bhagat singh koshyari)  इथे असताना त्यांचा अनुभव घेतल्यानंतर आपण बोललो होतो. राज्यघटनेत राज्यपाल ही एक संस्था आहे. या संस्थेचा गैरवापर किती झाला, हे सर्वोच्च न्यायालयाने (supreme court of india) निकालात स्पष्टपणे नमूद केले आहे. आता त्यांच्याबद्दल जास्त बोलण्याचे कारण नाही. भाजपने (BJP) जे केले त्याचे उदाहरण म्हणजे तत्कालीन राज्यपाल. न्यायालयाच्या निर्णयामुळे आता भाजपविरोधात प्रचार करणे सोपे होईल. (Sharad Pawar)

राज्यकर्त्यांबद्दल तीव्र भूमिका सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षावरील निकालात मांडल्याचे दिसून येते. काही निकाल अजून यायचे आहेत. त्यामध्ये सोळा आमदारांच्या अपात्रतेचा विषय आहे. विधानसभा अध्यक्ष स्वायत्त आहेत आणि त्यांनी घटनेनुसार काम करायला हवे, असे न्यायालयानेही स्पष्ट केल्याचे पवार (Sharad Pawar) यांनी निदर्शनाला आणून दिले.

ते म्हणाले, देशात जी परिस्थिती आहे ती पाहता देशातील लोकशाही वाचवण्यासाठी विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. मिळून काम केले तर देश अधिक बळकट होईल. कर्नाटकची जनता भाजपचा पराभव करेल. विरोधकांच्या ऐक्याबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आमच्या सहकार्‍यांशी चर्चा केली आहे. राज्यात आम्ही शिवसेना, काँग्रेस आणि अन्य पक्षांसोबत आहोतच.

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही

उद्धव ठाकरेंच्या (uddhav thackeray) राजीनाम्यावर आता चर्चा करण्यात अर्थ नाही. माझ्या पुस्तकात मी त्याबद्दल लिहिले आहे. सत्तेचा गैरवापर सातत्याने केला जात असून, त्याचेच हे उदाहरण आहे. त्यातूनच जयंत पाटील यांना 'ईडी'ची नोटीस आली आहे. देश पातळीवर आम्ही विरोधकांची मोट बांधत आहोत. आधी एकत्र येऊ, नंतर चेहरा ठरवू, असे त्यांनी स्पष्ट केले.


अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news