Sharad Pawar News Updates | राष्ट्रवादी बैठकीच्या अधिकृततेबाबत प्रश्नचिन्ह?, जितेंद्र आव्हाड पवारांच्या भेटीला

Sharad Pawar News Updates | राष्ट्रवादी बैठकीच्या अधिकृततेबाबत प्रश्नचिन्ह?, जितेंद्र आव्हाड पवारांच्या भेटीला

ठाणे : पुढारी वृत्तसेवा; राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केली. त्यातून राज्यात राजकीय भूकंप घडला आणि राजीनामे सत्र सुरू झाले. त्यानंतर आज सकाळी शरद पवार हे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार कार्यकर्ते यांनी पवार यांची मनधरणी सुरू केली. त्याचवेळी नवीन अध्यक्ष कोण असेल यासाठी नियुक्त झालेल्या कमिटीची बैठक झाली. मात्र या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)

आणि राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे बैठकीला नव्हते. ती बैठक अधिकृतपणे बोलावण्यात आली होती का? याबाबत आता चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान ठाण्यातील पत्रकार परिषद घेऊन आव्हाड हे पवारांना भेटायला निघाले आहेत. (Sharad Pawar News Updates)

शरद पवार यांचे खंदे समर्थक असलेले जितेंद्र आव्हाड हे मुंबईतील बैठकीला नसल्याने उलटसुलट चर्चा रंगली आहे. प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि आव्हाड यांची अनुपस्थिती ही चर्चचा विषय बनली आहे. याबाबत जितेंद्र आव्हाड यांना विचारणा केली असता, माझी पत्रकार परिषद होती, आता मुंबईला जात आहे, असे स्पष्ट केले.

तत्पूर्वी आव्हाड म्हणाले, शरद पवार ही महाराष्ट्राची गरज आहे. शरद पवार हे सक्रीय राजकारणातून बाजूला होणे म्हणजे महाराष्ट्राचे मोठे नुकसान आहे. सध्या राज्यात संस्कृतीहीन झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक, आर्थिक, उद्योग, राजकीय या सर्वच क्षेत्रात नुकसान होत आहे. हे नुकसान थांबविण्यासाठी शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती करताना आव्हाड पुन्हा भावूक झाले.

दरम्यान, शहराध्यक्ष तथा ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे, महिलाध्यक्षा सुजाताताई घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, युवती अध्यक्षा पल्लवी जगताप यांच्यासह सबंध ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविले आहेत.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news