पुढारी ऑनलाईन डेस्क : चाहत्याला थप्पड मारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) वादाच्या भाेवर्यात सापडला आहे. शाकिब एका मतदान केंद्राला भेट देण्यासाठी गेला असताना ही घटना घडली. दरम्यान, या सर्व गदारोळात रविवारी (७ जानेवारी) बांगलादेशमध्ये झालेल्या निवडणुकीत शाकिबचा मोठा विजय झाला आहे. अवामी लीगकडून मागुरा-१ मतदारसंघातून त्याने तब्बल 150,000 हून अधिक मतांच्या फरकाने खासदार झाला आहे. ( Bangladesh Election 2024 : Shakib Al Hasan )
शाकिबचा व्हायरल झालेला व्हिडिओ हा एका मतदान केंद्रावरील आहे. मागुरा-१ मतदारसंघातील बूथवर शाकिब कामकाज पाहण्यासाठी केला होता. यावेळी त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी उसळली. अनेक चाहत्यांनी शाकिबच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केल्याने एकच गोंधळ उडाला. यावेळी एका चाहत्याने शाकिबचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतप्त झालेल्या शाकिबने संबंधित चाहत्यालच्या कानशिलात लगावलला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ( Bangladesh Election 2024 : Shakib Al Hasan )
व्हायरल व्हिडीओनंतरच्या सर्व गदारोळात रविवारी शाकिबचा सार्वत्रनिक निवडणुकीत मोठा विजय झाला. त्याने तब्बल 150,000 हून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे.
हेही वाचा :