Dunki BO Collection Day 2: शाहरुखचा ‘डंकी’ तोडू शकला नाही ‘पठान’, ‘जवान’चा रेकॉर्ड

dunki movie
dunki movie

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' चित्रपटाचा आज दुसऱ्या दिवशीचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले होते. शाहरुख खानचा या वर्षातील हा तिसरा चित्रपट आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने ३० कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट 'पठान' आणि 'जवान'चा रेकॉर्ड तोडू शकला नाही. (Dunki BO Collection Day 2) डंकीने पहिल्या दिवशी ३० कोटींची कमाई केली होती. डंकीचा क्लॅश दुसऱ्याच दिवशी प्रभासच्या 'सालार'शी झाला. (Dunki BO Collection Day 2)

संबंधित बातम्या –

'डंकी' Vs 'सालार'

२०२३ च्या सुरुवातीला 'पठान' सुपर-डुपर हिट ठरला होता आणि नंतर 'जवान' सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. आता किंग खान राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी'सोबत चित्रपटगृहात दाखल झाला. डंकीची दुसऱ्या दिवशीची कमाई ठिकठाक राहिली.

दुसऱ्या दिवशी किती कमाई?

'डंकी'ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी जवळपास २० कोटी रुपयांचे कलेक्शन केलं आहे. आता दोन दिवसांचे एकूण कलेक्शन ४९.२० कोटी रुपये झाले आहे. वर्ल्डवाइड कमाई ५८ कोटी रुपये आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news