hina khan
hina khan

Hina Khan : अच्छा, तर तुम्ही मला सांगणार का, पोज कशी द्यायची? हिना भडकली… (Video)

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'ये रिश्ता क्या कहलाता' है फेम अभिनेत्री हिना खान आपल्या फॅशन आणि लुक्समुळे नेहमी चर्चेत राहते. ती चित्रपट निर्माते आनंद पंडित यांच्या ६० व्या वाढदिवसादिनी ग्रँड पार्टीमध्ये पोहोचली. (Hina Khan) तिचा लूक पाहताच पॅपराझींनी फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती. पण, यावेळी हिनी खानने असे काही म्हटले की, नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करणे सुरु केले. (Hina Khan)

संबंधित बातम्या –

हिनाने या पार्टीत डार्क पर्पल सीक्वेंस वर्क बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. यामध्ये ती खूप सुंदर आणि कॉन्फिडेंट दिसत होता. या पार्टीत काजोल, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, सलमान खान, जॅकी श्रॉफ, हिमेश रेशमिया, ऋतिक रोशन, राकेश रोशन, राज पाल यादव, अमीषा पटेलसह अनेक बॉलीवूड आणि टीव्ही स्टार पोहोचले होते.

हिना खान पार्टीत पोहोचताच पापराझी तिचे फोटो काढण्यासाठी उत्सुक होते. दरम्यान, एका कॅमेरामनने तिला पोज देण्यास सांगितले. यावर हिनाने जी रिॲक्शन दिली, ती काही नेटकऱ्यांना अजिबात आवडली नाही. हिनाला  पॅपराझींनी पोज देण्यासाठी सांगितल्यानंतर हिनाने नखरे दाखवले. आणि आश्चर्यजनक हावभाव करत म्हणाली की, अच्छा, तर तुम्ही मला सांगणार का पोज कशी द्यायची." हे सांगून हिना टाळ्या वाजवू लागली. पापराझींपैकी कुणीतरी हिनासाठी शिट्टी वाजवली. यावरदेखील हिनाची प्रतिक्रिया आली.

भडकले युजर्स

हिना खानने ज्याप्रकारे पॅपराझींशी बातचीत केली, ते सोशल मीडियावरील युजर्सना आवडले नाहीत. रिपोर्टनुसार, वरिंदर चावलाने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यावर वेगवेगळे प्रकारचे कॉमेंट्स येत आहेत. सारथ नावाच्या युजरने लिहिलं, "घमंड पाहा यांचा, उफ्फ….त्याने फक्त पोज देण्यासाठी म्हटलं आहे आणि ही या प्रकारे…"

आणखी एकाने लिहिलं, "खूप खराब ॲटिट्यूड आहे. हे उत्तर देण्याची पद्धत नाही. गर्विष्ठ." करिश्माने लिहिलं, "खरंच, कॅमेरामन आपलं काम करत होता आणि फोटोसाठी पोज द्येण्यास सांगितलं होतं. पण, हा हिनासाठी शिट्टी वाजवणं, बरोबर नाही, ते अयोग्य आहे."

video – varindertchawla x वरून साभार 
 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news