Bodyguard Ravi Singh: बॉलीवूडमधील सर्वात महागडा बॉडीगार्ड रवी सिंह

रवी सिंह हा मागील दहा वर्षांपासून शाहरुख खानचा बॉडीगार्ड आहे.
रवी सिंह हा मागील दहा वर्षांपासून शाहरुख खानचा बॉडीगार्ड आहे.

मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी आर्यन खान याची आज सकाळी मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली. आर्यन खान याला कारागृहातून बाहेर आणण्‍यासाठी शाहरुख खानचा बॉडीगार्ड रवि सिंह (  Bodyguard Ravi Singh )  हा गेला होता. यानंतर हा रवी सिंह कोण, अशी चर्चा सुरु झाली आहे.

बॉलीवूड सूपरस्‍टार शाहरुख खान याची 'किंग खान' अशीही ओळख आहे. गेली तीन दशक बॉलीवूडवर राज्‍य करणार्‍या शाहरुख खानची सुरक्षा व्‍यवस्‍थाही तितकीच कडेकोट आहे. रवी सिंह हा शाहरुख खानचा खासगी अंगरक्षक ( बॉडीगार्ड ) आहे. सावलीसारखा तो शाहरुखबरोबर असतो. मागील काही दिवस न्‍यायलय असो की आर्थर रोड कारागृह तो शाहरुख खानबरोबर दिसला होता.

एका रिपोर्टनुसार, रवी सिंह हा मागील दहा वर्षांपासून शाहरुख खानचा बॉडीगार्ड आहे. शाहरुख खानचा सर्वात विश्‍वासू व्‍यक्‍ती, अशीही त्‍याची ओळख आहे. त्‍यामुळेच कारागृहातून आर्यन खान बाहेर आणण्‍यासाठी शाहरुख खानने रवी सिंह यालाच पाठवले होते.

(  Bodyguard Ravi Singh ) सर्वात महागडा बॉडीगार्ड

सर्वात महागडा बॉडीगार्ड अशीही रवी सिंह ओळख आहे. त्‍याला वर्षाला २ कोटी ७ लाख रुपये पगार असल्‍याचीही चर्चा आहे.  तो शाहरुख खानचा बॉडीगार्ड आहेच त्‍याचबरोबर शाहरुख खानची पत्‍नी गौरी खान, मुले आर्यन खान, सुहाना खान आणि अबराम खान यांच्‍याही सुरक्षेची जबाबदारी त्‍याच्‍यावर असते. शाहरुख आणि त्‍याच्‍या संपूर्ण कुटुंबाच्‍या सुरक्षेची जबाबदारी त्‍याच्‍यावर आहे. त्‍यामुळेच त्‍याला कोट्यवधी रुपयांचा पगार दिला जातो.

२०१४ मध्‍येही रवी सिंह आला होता चर्चेत

रवी सिंह हा पहिल्‍यादा २०१४ मध्‍ये चर्चेत आला होता. एका कार्यक्रमात रवी सिंह याने धक्‍काबुक्‍की केल्‍याचा आरोप एका अभिनेत्रीने केला होता. या प्रकरणी रवि सिंह याच्‍याविरोधात तक्रारही दाखल करण्‍यात आली होती. मात्र गर्दीला नियंत्रण करण्‍यासाठी हा प्रकार घडल्‍याचा खुलासा रवी सिंह याने केला होता.

हेही वाचलं का?

पहा व्‍हिडिओ :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news