![तुला शिकवीन चांगलाच धडा](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F10%2F%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%A7%E0%A4%A1%E0%A4%BE-.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : झी मराठीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेची कथा कलाकारांचा अभिनय आणि या मालिकेत दाखवले जाणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत. नुकताच या मालिकेत अक्षरा आणि अधिपती यांचा राजेशाही विवाह चाहत्यांनी अनुभवलाय. दोघांच्या लग्नामध्ये आणि लग्नानंतर अनेक अडचणी आल्या होत्या. लग्नानंतर अक्षरा आणि अधिपती दोघं जेजुरीला खंडोबाच्या दर्शनाला गेले आहेत. दर्शनानंतर त्याच्या सुखी संसाराला सुरूवात होणार आहे.
संबधित बातम्या
या मालिकेच्या नवीन भागाचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. त्यामध्ये अधिपती अक्षराला खांद्यावर उचलून घेत जेजुरीचा गड चढताना दिसत आहे. या मालिकेच्या शूटिंगसाठी हे कलाकार खरोखरचं जेजुरीला गेले आहे. खंडोबाच्या देवळातील एक फोटो अक्षरा म्हणजे, अभिनेत्री शिवानी रांगोळीने शेअर केला आहे.
या फोटोमध्ये शिवानी पारंपारिक वेशभूषेत दिसत असून तिने कपाळावर भंडारा लावला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं, 'येळकोट येळकोट जय मल्हार!'. याच दरम्यान शिवानीच्या इन्स्टाग्रामवर ती खंडोबाच्या देवळाभोवती गोल दंडवत घालत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'मास्तरीण बाईंना काय काय करावं लागणार आहे?' असे लिहिले आहे. अक्षराचा हा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला आहे.
हेही वाचा :
(video : zeemarathiofficial and hrishishelar instagram वरून साभार)